३५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुजरातमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 11:34 PM2019-09-18T23:34:34+5:302019-09-18T23:38:05+5:30

कक्ष -१० च्या पथकाने गुजरात राज्यातील टोकियार, पोस्ट-बदरापूर ता-पालनपूर परिसरातून अटक केली.

From 35 years, the accused has been arrested from Gujarat | ३५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुजरातमधून अटक

३५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुजरातमधून अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे३५ वर्षानंतर ६५ वर्षाचा झाल्यानंतर पोलिसांची त्याला अटक केली. सहार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामिनावर मुक्त होऊन फरार झालेला आरोपी

मुंबई - बनावट नोटा जवळ बाळगल्याप्रकरणी १९८५ साली सहार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामिनावर मुक्त होऊन फरार झालेल्या आरोपीला तब्बल ३५ वर्षानंतर गुन्हे शाखेच्या कक्ष -१० च्या पथकाने गुजरात राज्यातील टोकियार, पोस्ट-बदरापूर ता-पालनपूर  परिसरातून अटक केली. २८ वर्षाचा असताना आरोपीने गुन्हा केला. अटकेनंतर जामिनावर सुटलेला आरोपी फरार झाला. त्याला ३५ वर्षानंतर ६५ वर्षाचा झाल्यानंतर पोलिसांची त्याला अटक केली. 

बनावट नोटाजवळ बाळगल्याप्रकरणी मुंबईच्या सहार पोलिसांनी सहार एअरपोर्ट येथून ११ जणांना बनावट नोटांसह अटक केली होती. त्यांच्यावर सहार पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. २८ वर्षीय आरोपीची न्यायालयातून जामिनावर सुटका करून घेतली आणि फरार झाला. तब्बल ३५ वर्ष या आरोपीने पोलिसांना गुंगारा देत गुजरात राज्यात लपून बसला होता. सादर आरोपीचा शोध घेण्याच्या आदेशानुसार स्थानिक पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या कक्ष १० चे पथक सातत्याने पाठपुरावा करीत होते. दरम्यान पोलीस पथकाने मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहिद पठाण याना विश्वसनीय माहिती मिळाली. त्यांनी  गुजरात राज्यातील टोकियार, पोस्ट-बदरापूर ता-पालनपूर येथे दडी मारून बसलेल्या ६५ वर्षीय इसमाला अटक केली. कारण गुन्हा दाखल झाला तेव्हा आरोपी २८ वर्षाचा होता. मात्र ३५ वर्ष फरार झाल्यानंतर अटकेच्या वेळी तो ६५ वर्षाचा असल्याने त्याची ओळख पटविणायसाठी पोलीस पथकाला कसरत करावी लागली. आज अटक आरोपीला फेर अटकेसाठी आणि तपासासाठी सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

Web Title: From 35 years, the accused has been arrested from Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.