३५ वर्षीय रिक्षा चालकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 16:07 IST2022-03-04T16:06:50+5:302022-03-04T16:07:00+5:30
विठ्ठलवाडी पोलीसानी आरोपीला ठोकल्या बेड्या

३५ वर्षीय रिक्षा चालकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार
उल्हासनगरात विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. एका ३५ वर्षीय इसमाने ६ महिन्यांपासून एका अल्पवयीन मुलीशी ओळख करून ओळखीतुन शारीरिक संबंध ठेऊन अत्याचार केला. घटनेचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. नराधम आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना समोर आली. एका ३५ वर्षीय रिक्षा चालकाने एका अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिच्या वर पाच महिने अत्याचार केला ही बाब मुलीच्या आई-वडिलांना कळताच मुलीच्या आईवडिलांनी पोलीस स्थानकात धाव घेत रिक्षा चालक दीपक हिवाळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्याचबरोबर विठ्ठलवाडी पोलिसांनीही गुन्हा गांभीर्याने घेत २४ तासांच्या आत आरोपी दीपक हिवाळे याला बेड्या ठोकत पुढील तपास सुरू केला आहे.