गोव्यात ३0 लाखांचा तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:23 IST2017-09-08T20:19:56+5:302017-09-08T20:23:30+5:30

गोव्यात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री, वितरण याला कायद्याने मनाई आहे. अन्न सुरक्षा व दर्जा कायद्यानुसार गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

30 lakhs of tobacco seized in Goa | गोव्यात ३0 लाखांचा तंबाखू जप्त

गोव्यात ३0 लाखांचा तंबाखू जप्त

काणकोण/पणजी : अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी पोळे-काणकोण येथे चेकनाक्यावर ३0 लाख रुपये किमतीचा तंबाखू जप्त केला. केए-0५-एजी-६२0७ क्रमांकाच्या ट्रकमधून तंबाखूच्या २00 गोणी मडगाव येथे आणल्या जात होता. काणकोण पोलिसांकडून ही माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अन्न निरीक्षक राजीव कोरडे यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना झाले. चेन्नई येथून आणलेला हा तंबाखू मडगाव येथे पुरविला जाणार होता. कारवाई करणा-या पथकात कोरडे यांच्याबरोबर अन्न सुरक्षा अधिकारी अमित नाईक, अटेंडंट साईनाथ मांद्रेकर सहभागी झाले.

Web Title: 30 lakhs of tobacco seized in Goa