3-year-old man committed suicide by strangulation | २७ वर्षीय पुरुषाने गळफास घेऊन केली आत्महत्या 
२७ वर्षीय पुरुषाने गळफास घेऊन केली आत्महत्या 

ठळक मुद्दे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव नितेश गायकवाड (२७) असं आहे. याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई - अँटॉप हिल परिसरात आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर अँटॉप हिल पोलीस घटनास्थळी आले. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव नितेश गायकवाड (२७) असं आहे. 

आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास नितेश यांनी अँटॉप हिल चर्चच्या बाजूला असलेल्या नवतरुण नाईक नगर येथील राहत्या घरी आत्महत्या केली. राहत्या घरी सिलिंग फॅनला बेडशीट बांधून गळफास घेऊन नितेशने आत्महत्या केली. त्यानंतर याबाबत अँटॉप हिल पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नितेशचा मृतदेह शवविच्छेदानासाठी सायन रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.  

Web Title: 3-year-old man committed suicide by strangulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.