हृदयद्रावक! ३ वर्षाच्या मुलीवर अपहरण करून बलात्कार, गळा आवळून मृतदेह फेकला जंगलात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 14:08 IST2020-04-14T14:05:20+5:302020-04-14T14:08:04+5:30
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हृदयद्रावक! ३ वर्षाच्या मुलीवर अपहरण करून बलात्कार, गळा आवळून मृतदेह फेकला जंगलात
मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातून हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. येथे तीन वर्षांच्या निरागस मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर लैंगिक शोषण करण्यात आले. त्यानंतर गळा आवळून तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह जंगलात फेकला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
१५ मार्च रोजी बैतुलच्या चिचोली पोलिस स्टेशन परिसरातील एका गावातून चॉकलेटच्या आमिषाने तीन वर्षीय निरागस मुलीचे अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर पोलिसांना माहिती मिळाली की, अपहृत मुलीला विनोद उर्फ टिंकू साबळे याच्यासोबत शेवटचे पहिले होते.
पोलिसांनी अपहरणकर्ता विनोदचा शोध सुरू केला होता, परंतु तो फरार झाला होता. रविवारी विनोद साबळे याला झालार पोलीस स्टेशन परिसरातून अटक झाल्यानंतर आरोपीने चिचोली पोलीस ठाण्यात रिमांड घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पहिल्याच दिवशी बलात्कार करून तिची हत्या केली.
या प्रकरणात पोलिसांनी रविवारी आरोपीला घटनास्थळी आणले. एसडीओपी महेंद्रसिंग मीणा यांनी सांगितले की, मुलीचा सांगाडा ताब्यात घेऊन त्याला डीएनए चाचणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. येथे एसपी डीएस भदौरिया यांनी आरोपीला शोधून देणार्यास दहा हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.