तळपायाची आग मस्तकात जाईल; ३ महिन्याच्या चिमुरडीला गरम लोखंडी रॉडने दिले ५१ चटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 23:01 IST2023-02-03T23:00:49+5:302023-02-03T23:01:16+5:30
या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

तळपायाची आग मस्तकात जाईल; ३ महिन्याच्या चिमुरडीला गरम लोखंडी रॉडने दिले ५१ चटके
शहडोल - मध्य प्रदेशच्या शहडोल इथं हैराण करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी ३ महिन्याच्या चिमुरडीला न्यूमोनियामुळे उपचारासाठी संताप आणणारा प्रकार केला आहे. अंधविश्वासामुळे मुलीच्या पोटावर जवळपास ५१ वेळा गरम रॉडचे चटके देण्यात आले. ज्यामुळे मुलीची अवस्था खराब झाली. या घटनेनंतर नातेवाईकांनी तात्काळ तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना शहडोल जिल्ह्यातील सिंहपूर कथौटिया येथील आहे. जिथे ३ महिन्यांच्या मुलीला न्यूमोनियामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. यावेळी अंधश्रद्धेपोटी घरच्यांनी तिला भोंदूबाबाकडे नेले. जिथे भोंदूबाबानं मुलीवर एक-दोनदा नव्हे तर ५१ वेळा चटके दिले. त्यामुळे मुलीची प्रकृती ढासळली.
उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू
या मुलीवर उपचार करण्याऐवजी तिला भोंदूबाबाने गरम लोखंडी रॉडनं चटके देण्यात आले असं डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मुलीची प्रकृती अधिकच बिघडली. न्यूमोनियाचा संसर्ग मेंदूमध्येही पसरला. मुलीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.
तपासाचे आदेश
याप्रकरणी शहडोलच्या जिल्हाधिकार्यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविकेने नवजात मुलीच्या आईची दोनदा समजूत काढली होती, मात्र तरीही मुलीला गरम लोखंडी रॉडने चटके देण्यात आले. हा मृत्यू न्यूमोनियामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु चटके दिल्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी महिला व बालविकास अधिकारी रुग्णालयात पोहोचले असता त्यांना ही घटना १५ दिवस जुनी असल्याचे समजले. जिथे मुलीला न्यूमोनियामुळे झाला होता. त्यामुळे मुलीचा मृत्यू झाला असं सांगितले.