मलकापूरात धाडसी चोरी, ३ लाखाचा मुद्देमाल लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 14:18 IST2018-07-11T14:15:43+5:302018-07-11T14:18:55+5:30

मलकापूर: येथील भारत कला रस्त्यावरील घरात धाडसी चोरीची घटना ११ जुलैरोजी उघडकीस आली.

3 lakhs thept in malkapur house | मलकापूरात धाडसी चोरी, ३ लाखाचा मुद्देमाल लंपास 

मलकापूरात धाडसी चोरी, ३ लाखाचा मुद्देमाल लंपास 

ठळक मुद्दे२८ हजार ५० रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ७ हजार ८५० रुपयांचा लंपास केला. मलकापूर शहरातील क्राईम रेट वाढला असून अलीकडच्या पंधरा दिवसातील ही पाचवी चोरीची घटना आहे.

मलकापूर: येथील भारत कला रस्त्यावरील घरात धाडसी चोरीची घटना ११ जुलैरोजी उघडकीस आली. त्यात सुमारे ३ लाख ७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केली असून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. येथील रहदारीच्या भारत कला रस्त्यावरील भगवानदास किसनलाल गांधी यांच्या घरात मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करीत आतील २८ हजार ५० रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ७ हजार ८५० रुपयांचा लंपास केला. यासंदर्भात त्यांनी शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिस निरिक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात प्रशांत कावरे यांनी तपास चक्रे फिरवली आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध अप.क्र. २३८/१८ कलम ४५७, ३८० भादवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

चोरीचे प्रमाण वाढले 
मलकापूर शहरातील क्राईम रेट वाढला असून अलीकडच्या पंधरा दिवसातील ही पाचवी चोरीची घटना आहे. मलकापूर शहरात रात्रीची गस्त पोलिसांनी अनेक भागात बंद केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याप्रकाराची उपविभागीय पोलिस अधिकाºयांनी दखल घेवून पोलिस प्रशासनाला समज देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: 3 lakhs thept in malkapur house