३ ड्रग्ज तस्करांना बेड्या; ३० किलो गांजासह नशेची औषधं पोलिसांनी केली हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 20:40 IST2019-03-06T20:38:19+5:302019-03-06T20:40:53+5:30
पोलिसांनी घाटकोपर परिसरातून नशा आणणाऱ्या ३७० औषधांच्या बाटल्या आणि सायन परिसरातून ३० किलोचा गांजा हस्तगत केला आहे.

३ ड्रग्ज तस्करांना बेड्या; ३० किलो गांजासह नशेची औषधं पोलिसांनी केली हस्तगत
मुंबई - गर्दुल्यांना अमली पदार्थ पुरवणाऱ्या तीन जणांना अमली पदार्थविरोधी विभागानेअटक केली आहे. पोलिसांनी घाटकोपर परिसरातून नशा आणणाऱ्या ३७० औषधांच्या बाटल्या आणि सायन परिसरातून ३० किलोचा गांजा हस्तगत केला आहे. पोलिसांनी तस्करांची केलेली धरपकड आणि कारवाई यामुळे ड्रग्ज तस्करांवर वाचक बसण्याची शक्यता आहे.
घाटकोपरच्या गोळीबारनगर परिसरात नशेची औषधं पुरवण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाला मिळाली होती. त्यानुसार एएनसीच्या घाटकोपर युनिटने सापळा लावला होता. यावेळी फिरोज वाजिद अली शेख (३९) हा त्या ठिकाणी आला. पोलिसांना संशयास्पद हालचालींवरून त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या बॅगेत नशेच्या ३७० बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांची बाजारात किंमत ७४ हजार रुपये असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.