अश्लील व्हिडिओ करून मागितली 3 कोटीची खंडणी, हनीट्रॅपमध्ये अडकला क्लासवन अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 03:17 PM2021-05-18T15:17:49+5:302021-05-18T15:20:51+5:30

Honeytrap : नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

3 crore ransom demanded for pornographic videos, class one officer also caught in honeytrap | अश्लील व्हिडिओ करून मागितली 3 कोटीची खंडणी, हनीट्रॅपमध्ये अडकला क्लासवन अधिकारी

अश्लील व्हिडिओ करून मागितली 3 कोटीची खंडणी, हनीट्रॅपमध्ये अडकला क्लासवन अधिकारी

Next

अहमदनगर: नगर तालुक्यातील जखणगाव येथील महिलेच्या हनीट्रॅपमध्ये नगर शहरातील एक क्लासवन अधिकारीही अडकल्याची खळबळजनक बाब समोर आली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सदर महिलेसह पाच आरोपींविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी यातील एका आरोपीला अटक केली आहे. अश्लील व्हिडिओ तयार केल्यानंतर  सदर महिला व तिच्या साथीदारांनी या अधिकार्‍याकडे तीन कोटींची खंडणी मागितली होती. त्यातील 80 हजार रूपये त्याने दिले होते. सदर अधिकाऱ्याला घरी बोलावून त्याला शरीरसंबंध करण्यास भाग पडून महिला व तिच्या साथीदारांनी त्याचा व्हिडिओ तयार करून घेतला. या अनैतिक कृत्यात त्या महिलेचा खास एजंट अमोल मोरे, सचिन खेसे (रा. हिगंणगाव ता. नगर), सागर खरमाळे, महेश बागले (दोघे रा. नगर) यांचाही समावेश आहे. सचिन खेसे याला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान सदर महिला व तिच्या साथीदारांनी अशा पद्धतीने अनेकांना ब्लॅकमेल केल्याची चर्चा असून पोलिसांनी या गुन्ह्याचा कसून तपास सुरू केला आहे. महिलेचा जाळ्यात अडकलेला सदर अधिकारी जखणगाव शेजारच्या गावातील रहिवासी आहे. सदर महिलेच्या विरोधात खंडणीचा पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर या अधिकाऱ्याने पोलिसांशी संपर्क करून आपबिती सांगितली. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Web Title: 3 crore ransom demanded for pornographic videos, class one officer also caught in honeytrap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app