3 arrested for gang-raping 15-year-old tribal girl in Uttan | उत्तन येथे १५ वर्षीय आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी ३ आरोपीना अटक

उत्तन येथे १५ वर्षीय आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी ३ आरोपीना अटक

 मीरारोड - एका १५ वर्षीच्या अल्पवयीन आदिवासी मुलीला बळजबरी उचलून निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी तिघाही आरोपीना अटक केली आहे . सदर आरोपी पुलंचे उत्तर प्रदेशचे आहेत . ह्या घटनेने उत्तन परिसर हादरला असून स्थानिकां मध्ये संताप व्यक्त होत आहे . अंबेस गौतम (२०), इंद्रजित गौतम (२४) आणि संजय भारती (२६) अशी आरोपींची नावे असून, हे  तिघेही उत्तर प्रदेशच्या आंबेडकरनगर जिल्ह्यातील मुसताबादचे राहणारे आहेत. 

उत्तन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदरची घटना हि मंगळवारी रात्री साडे आकरा ते साडे बारा दरम्यान घडली . पीडित मुलगी हि तिची अल्पवयीन मैत्रीण व त्या मैत्रिणीचे २ अल्पवयीन मित्र असे गप्पा मारत बसले होते . त्यावेळी अनुक्रमे २० , २४ व २६ वर्षीय तिघे आरोपी तेथे गेले व दोन्ही अल्पवयीन मुलींना दमदाटी करून बळजबरी नेऊ लागले . पीडितेची मैत्रीण व तिचे २ मित्र कसे बसे त्यांच्या तावडीतून निसटले व घेरी जाऊन त्यांनी घडला प्रकार सांगितला .

परंतु तिघांनी पीडितेला मात्र पकडून धावगी डोंगरा खालील मासळी सुकवण्यासाठीच्या असलेल्या निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला व पसार झाले . दरम्यान गावात पीडितेला नेल्याचे कळल्यावर सर्वानी शोधाशोध सुरु केली तसेच पोलिसांना कळवले .

पोलीस निरीक्षक प्रशांत लागीं व पोलीस पथकाने तातडीने तपास सुरु करत सदर तिघाही आरोपीना अटक केली . तर पीडितेस उपचारासाठी व तपासणी साठी रुग्णालयात पाठवले . ठाणे न्यायालयात बुधवारी तिघाही आरोपीना हजर केले असता न्यायालयाने २२ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .

पीडित आदिवासी मुलीचे आई वडील हे लहान पणीच वारले असून येथील एका मच्छिमार कुटुंबीयांनी तिचा कुटुंबातील सदस्य प्रमाणेच मोठे केले . तर नराधम आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून ते मागासवर्गीय समाजातील आहेत . आरोपी देखील मच्छिमारां कडे त्यांच्या बोटीवर काम करणारे आहेत . अश्या प्रकारची घटना उत्तन परिसरात पहिल्यांदा घडल्याने खळबळ उडाली असून संतापाचे वातावरण आहे .

Web Title: 3 arrested for gang-raping 15-year-old tribal girl in Uttan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.