हात-पाय बांधून रात्रभर सामूहिक बलात्कार, तरुणीची अवस्था पाहून पोलिसांनाही बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 02:47 PM2021-09-17T14:47:55+5:302021-09-17T15:17:03+5:30

Crime News Chhattisgarh: मुंबईतील बलात्काराची घटना ताजी असतानाच छत्तीसगडमध्ये तरुणीचे हात-पाय बांधून गोठ्यात रात्रभर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

a 28 year woman gang-raped all night in chhatisgarh | हात-पाय बांधून रात्रभर सामूहिक बलात्कार, तरुणीची अवस्था पाहून पोलिसांनाही बसला धक्का

हात-पाय बांधून रात्रभर सामूहिक बलात्कार, तरुणीची अवस्था पाहून पोलिसांनाही बसला धक्का

Next

रायपूर: मुंबईच्या साकीनाका भागात एका 30 वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच तिकडे छत्तीसगडमध्येही अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे. एका 28 वर्षीय तरुणीला गोठ्यात बांधून रात्रभर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी पीडित तरुणी गावातील सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेली होती, पण रात्री उशीरापर्यंत ती घरी परतली नाही. यानंतर कुटुंबियांनी रात्रभर तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. अखेर दुसऱ्या दिवशी कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ तपासाचे चक्र फिरवले आणि 15 सप्टेंबर रोजी तरुणी गावातील विजय कंवर नावाच्या व्यक्तीच्या घरातील गोठ्यात जखमी अवस्थेत सापडली. 

पोलिसांनी सांगितल्यानुसार, तरुणीचे हात-पाय बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तसेच, तीन दिवसांपासून तिला अन्न-पाण्याचा कणही दिला गेला नव्हता. तरुणीची ती अवस्था पाहून पोलिसांचाच थरकाप उडाला. पोलिसांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले आणि पीडित तरुणीच्या साक्षीवरुन गावातील बाल वसतिगृहाचा अधीक्षक विजय कंवर (30), सरपंचाचा नातलग रामलाल कंवर उर्फ ​​बल्ला ( 30) आणि हिरालाल (26) यांना अटक केली आहे.
 

Read in English

Web Title: a 28 year woman gang-raped all night in chhatisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app