दोन अल्पवयीन आरोपींकडून २५ मोबाईल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 16:11 IST2018-11-24T16:11:40+5:302018-11-24T16:11:58+5:30
मोबाईल चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन आरोपींना चिखली पोलिसांनी जेरबंद केले आहे.

दोन अल्पवयीन आरोपींकडून २५ मोबाईल जप्त
पिंपरी : चिखली व निगडी परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन आरोपींना चिखली पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीचे २५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. कुदळवाडी, चिखली भागात चिखली पोलिसांचे पथक गस्त घालत असताना रहिमान वजन काट्याजवळ आले. येथे दोन संशयित मुले काळया रंगाची दुचाकीवरुन जाताना दिसली. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते न थांबल्याने त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडण्यात आले. त्यांच्यापैकी एकाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक मोबाईल आढळला तर दुसरया मुलाकडे दोन मोबाईल सापडले. यातील एक मोबाईल चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्हयातील असल्याचे समोर आले. याबाबत अधिक चौकशी केली असता या दोन अल्पवयीन मुलांकडून १ लाख १४ हजार रुपये किंमतीचे एकूण २५ मोबाईल जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक संदीप बागुल, हवालदार मंगेश गायकवाड, राम साबळे, सुरेश जाधव, सुनील शिंदे, नरहरी नाणेकर, अमोल साकोरे, सचिन गायकवाड, कबीर पिंजारी यांच्या पथकाने केली. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.