पत्रकाराच्या हत्येप्रकरणी २४ वर्षीय तरुणीस बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 21:13 IST2019-03-18T21:11:46+5:302019-03-18T21:13:37+5:30
याप्रकरणी अंकिता मिश्रा या तरुणीला काशिमिरा पोलिसांनी अटक केली आहे.

पत्रकाराच्या हत्येप्रकरणी २४ वर्षीय तरुणीस बेड्या
मीरा रोड - काशिमिरा येथील पत्रकाराच्या कार्यलयात कामाला असलेल्या २४ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंधातून तिच्याकडे शारीरिक सुखाच्या मागणीला कंटाळलेल्या प्रेयसीनेच साथीदाराच्या मदतीने संपादकाची निर्घृण हत्या करुन भिवंडीत मृतदेह फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अंकिता मिश्रा या तरुणीला काशिमिरा पोलिसांनी अटक केली आहे.
विशेष म्हणजे प्रेयसीने साथीदाराच्या मदतीने संपादकाला रो-हाउस दाखवण्याच्या बहाण्याने एका कारमध्ये डोंगरात नेवून त्याला कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत दोघांनी दोरीच्या सहय्याने कारमध्येच त्यांची गळा आवळून निर्घुण हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने भिवंडी तालुक्यातील खर्डी गावानजीक निर्जनस्थळी असलेल्या नाल्यात त्यांचा मृतदेह फेकून दिला होता. नित्यानंद पांडे (४६) असे हत्या झालेल्या संपादकाचे नाव आहे. सतीश मिश्रा असे हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अंकिताच्या साथीदाराचे नाव आहे.