शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील नृत्य करताना ऑर्केस्ट्रा बारमध्ये सापडल्या तब्बल २४ बारबाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 22:03 IST

ग्राहक व बार कर्मचारी यांच्यासह ३३ जणांना अटक

ठळक मुद्दे पोलीसांनी त्या बारबालांची सुटका करत बारमध्ये अय्याशी करणाऱ्या ग्राहकांसह बारचे कर्मचारी आदी मिळुन ३३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. बारबाला आकर्षक व तोकडे कपडे घालून अश्लिल नाच करत होत्या.अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुजरात, चंदिगड, मुंबई आणि मीरा भाईंदरमधील ग्राहकांचा समावेश आहे.

मीरारोड - काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील नाईट लाईफ ( सनसिटी ) या ऑर्केस्ट्रा बारवर पोलीस उपअधीक्षक शशिकांत भोसले आणि पथकाने मंगळवारी रात्री धाड टाकली असता बारमध्ये तब्बल २४ बारबाला अश्लिल नाच करताना आढळून आल्या. पोलीसांनी त्या बारबालांची सुटका करत बारमध्ये अय्याशी करणाऱ्या ग्राहकांसह बारचे कर्मचारी आदी मिळुन ३३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर बारचे चालक - मालकाचा शोध सुरु आहे.पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड व अपर अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीनुसार भोसले व त्यांच्या पथकाने मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास सनसिटी ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकली. या धाडीत ऑर्केस्ट्रा बारमध्ये केवळ ४ गायिकांना ठेवण्याची परवानगी असताना तब्बल २४ बारबाला बारचालकाने ठेवल्या होत्या. बारबाला आकर्षक व तोकडे कपडे घालून अश्लिल नाच करत होत्या.सदर बारमध्ये बारचे चालक - मालक, कर्मचारी व ग्राहकांकडून सदर बारबालांना अश्लिल नृत्य करण्यास संगनमताने प्रोत्साहित केल्याप्रकरणी तसेच ऑर्केस्ट्रा बारमध्ये नाचण्यास प्रतिबंध असल्याने ३४ जणांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अय्याशी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसह बार कर्मचारी, बाऊंसर आदी ३३ जणांना पोलीसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुजरात, चंदिगड, मुंबई आणि मीरा भाईंदरमधील ग्राहकांचा समावेश आहे. या घटनेने शहरातील ऑर्केस्ट्रा बारमध्ये सर्रास बारबालांना नाचवले जात असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :raidधाडPoliceपोलिसdanceनृत्यMira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोड