मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर २२ वर्षीय तरुणीची गोळ्या झाडून हत्या; एकतर्फी प्रेमातून तरुणानेही जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 00:36 IST2021-01-05T00:36:13+5:302021-01-05T00:36:49+5:30

Crime News, Murder : दोघांचीही ओळख पटली असून रात्री साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले असुन प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

22-year-old girl shot dead on Mumbai's busy streets; youth also commit suicide | मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर २२ वर्षीय तरुणीची गोळ्या झाडून हत्या; एकतर्फी प्रेमातून तरुणानेही जीवन संपवले

मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर २२ वर्षीय तरुणीची गोळ्या झाडून हत्या; एकतर्फी प्रेमातून तरुणानेही जीवन संपवले

मुंबई: एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर हत्या करत नंतर स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. गोरेगावच्या बांगुरनगर परिसरात असलेल्या इन्फिनिटी मॉलच्या पाठीमागे हा खळबळजनक प्रकार घडला. 


दोघांचीही ओळख पटली असून रात्री साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले असुन प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.


इनफिनिटी मॉलजवळ रात्री 8 ते 9 च्या दरम्यान 25 वर्षीय तरुणाने अचानक फायरिंग सुरू केली. त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला. या तरुणाने आधी 22 वर्षीय मुलीचा खून केला आणि त्यानंतर स्वत:वरही गोळ्या झाडल्या. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर गोळीबार करणाऱ्या तरुणानेही नंतर प्राण सोडले.

Web Title: 22-year-old girl shot dead on Mumbai's busy streets; youth also commit suicide

टॅग्स :Murderखून