प्रेम संबंधातून २२ वर्षीय तरुणीची हत्या, आरोपीने स्वतःवर देखील केले वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:04 IST2025-02-01T10:13:42+5:302025-02-01T14:04:16+5:30
आरोपीवर एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे उपचार सुरू आहेत.

प्रेम संबंधातून २२ वर्षीय तरुणीची हत्या, आरोपीने स्वतःवर देखील केले वार
- मयूर तांबडे
नवीन पनवेल : प्रेम संबंधातून २२ वर्षीय तरुणीची हत्या केल्याचा प्रकार नवीन पनवेल, सेक्टर 18 येथे उघडकीस आला. त्यानंतर आरोपीने स्वतःवर देखील वार केले. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीवर एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील हत्या झालेल्या तरुणीचे नाव जागृती हरेश सत्वे (राहणार ज्योती अपा. सेक्टर 18, नवीन पनवेल) असे असून आरोपी निकेश भगवान शिंदे (राहणार दिवेगाव, ठाणे, वय २५) याच्यासोबत तिचे प्रेम संबंध होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले आणि जागृतीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून निकेश शिंदे हा ३१ जानेवारीला तिच्या घरी गेला आणि दुसऱ्यासोबत संबंध ठेवू नकोस असे बोलून तिच्याशी वादविवाद करून शिवीगाळ आणि हाताने मारहाण केली. यावेळी तिच्या घरी आई आणि तिची बहीण देखील होती.
संध्याकाळी पावणे सहा ते साडेसहाच्या दरम्यान आरोपीने जागृती सत्वे हिच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर देखील वार केले. या हल्ल्यात जागृती सत्वे हिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. सध्या आरोपीवर एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे उपचार सुरू आहेत.