शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

राज्यात सुरळीत वाहतुकीसाठी पोलिसांची आणखी २१४४ पदे; मुंबई आयुक्तालयातर्गंत ६२० पदे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 7:35 PM

तीन पोलीस अधीक्षकासह ६ उपअधीक्षकांचा समावेश

ठळक मुद्दे गृह विभागाने नुकत्याच घटकनिहाय पदाच्य वाटपला हिरवा कंदील दाखविला आहे.उच्च न्यायालयाने सुचविलेल्या उपाययोजनानुसार सुरळीत वाहतूक नियंत्रणासाठी पहिल्या टप्यात इतकी पदे भरण्यात येत आहेत.

मुंबई - राज्यातील वाढते अपघात आणि वाहतुकीच्या कोंडीला प्रतिबंधासाठी राज्य पोलीस दलात आता आणखी २१४४ पदे भरण्यात येणार आहेत. तीन उपायुक्त, ६ उपअधीक्षकांसह २७ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयातर्गंत त्यातील सर्वाधिक ६२० पदे देण्यात आलेली आहेत. गृह विभागाने नुकत्याच घटकनिहाय पदाच्य वाटपला हिरवा कंदील दाखविला आहे.

उच्च न्यायालयाने सुचविलेल्या उपाययोजनानुसार सुरळीत वाहतूक नियंत्रणासाठी पहिल्या टप्यात इतकी पदे भरण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी जागाची निर्मिती केली जाईल, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. वाहतूक कोंडीची समस्यावर ठोस कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका २०१३ मध्ये दाखल करण्यात आली होती. ती निकालात काढताना न्यायालयाने राज्य सरकारला विविध उपाययोजना सुचिवल्या. त्यानुसार वाहतुक शाखेसाठी स्वतंत्र पदाची निर्मिती करण्याची सूचना होती. त्यांच्याकडून रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी, अनाधिकृतपणे सोडून दिलेली , बेवारस वाहने हटविणे, ही जबाबदारी प्रामुख्याने सोपविण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी संंबंधित अधिकारी, अंमलदारांनी विविध उपाययोजना राबवायच्या आहेत.न्यायालयाने सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील विविध वाहतुक शाखांकरिता एकूण विविध दर्जाची २१४४ पदे दव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव यावर्षी २३ जानेवारीला प्रस्ताव गृह विभागाला सादर केला होता. त्या पदाची पोलीस घटकनिहाय वाटप करण्यात आलेली आहे.नव्याने निर्माण करण्यात येणारी सवर्गनिहाय पदेपद                                             संख्याअधीक्षक                                       ३उपअधीक्षक                                  ६निरीक्षक                                      २७सहाय्यक निरीक्षक                      ६३उपनिरीक्षक                               १०८सहाय्यक फौजदार                     १२६हवालदार                                   ३७९शिपाई                                     ११४३चालक शिपाई                          २८९

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिसMumbaiमुंबई