तणावात २१ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; कांदिवलीला आईवडिलांसोबत होता वास्तव्यास
By गौरी टेंबकर | Updated: November 26, 2023 15:44 IST2023-11-26T15:43:47+5:302023-11-26T15:44:14+5:30
२४ नोव्हेंबरला घरात एकटाच असताना घेतला टोकाचा निर्णय

तणावात २१ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; कांदिवलीला आईवडिलांसोबत होता वास्तव्यास
गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तणावामध्ये प्रकाश झा (२१) नावाच्या एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. जा हा कांदिवली पूर्व च्या बिहारी टेकडी परिसरात आई-वडिलांसोबत राहत होता. त्याची आई मनोरुग्ण असून काही दिवसांपूर्वी त्याचे वडील तिला घेऊन उपचारासाठी त्यांच्या गावी बिहारला गेले होते. तर त्याचा मोठा भाऊ याचा पाच वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे २४ नोव्हेंबर रोजी तो घरात एकटाच होता आणि त्यावेळी त्याने हा प्रकार केल्याची माहिती आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ नोव्हेंबरला पिण्याचे पाणी आल्यावर शेजाऱ्यांनी त्याचा दरवाजा ठोठावला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. याची माहिती समता नगर पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी घावेत त्याला स्थानिक रुग्णालयात हलवले. डॉक्टरने त्याला दाखल पूर्व मयत घोषित केले. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याच्या कुटुंबीयांचा तसेच शेजाऱ्यांचा जबाब नोंदवला जात आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.