2008 Batla House Encounter : इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिझ खानला मृत्यूदंडाची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 07:14 PM2021-03-15T19:14:18+5:302021-03-15T19:15:26+5:30

2008 Batla House Encounter Convict Ariz Khan Sentenced To Death : २००८ मध्ये घडलेल्या बाटला हाऊस चकमक प्रकरणानंतर आरिझ फरार झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली होती.

2008 Batla House Encounter: Indian Mujahideen terrorist Ariz Khan sentenced to death | 2008 Batla House Encounter : इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिझ खानला मृत्यूदंडाची शिक्षा 

2008 Batla House Encounter : इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिझ खानला मृत्यूदंडाची शिक्षा 

Next
ठळक मुद्देबाटला हाऊस चकमकीत जीव गमवावा लागलेल्या पोलीस निरीक्षक मोहन शर्माच्या हत्येसाठी आरिझला दोषी ठरवण्यात आलं आहे

राजधानी दिल्लीत सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बाटला हाऊस चकमक प्रकरणी दिल्ली न्यायालयाने आज इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिझ खान याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायालयाने शिक्षेचा निर्णय सायंकाळी ४ वाजेपर्यंत राखून ठेवला होता. पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी आरिझ खानला फाशीची शिक्षा सुनावली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली होती.

मागील सुनावणीत न्यायालयाने आरिझ खानला दोषी ठरवलं होतं. दिल्ली पोलिसांनी त्याला २०१८ मध्ये अटक केली होती. मागील आठवड्यात न्यायालयाने आरिझ खानला आर्म्स ऍक्ट आणि कलम ३०२, ३०७ अंतर्गत दोषी ठरवलं होते. २००८ मध्ये घडलेल्या बाटला हाऊस चकमक प्रकरणानंतर आरिझ फरार झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली होती.

बाटला हाऊस चकमकीत जीव गमवावा लागलेल्या पोलीस निरीक्षक मोहन शर्माच्या हत्येसाठी आरिझला दोषी ठरवण्यात आलं आहे. तसेच, पोलीस कर्मचारी बलवंत सिंह-राजवीर यांना देखील त्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. २००८ मध्ये दिल्ली पोलीस आणि दक्षिण दिल्लीच्या परिसरातील दहशतवाद्यांमधील चकमकीमुळे पोलीस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांचा मृत्यू झाला होता तर दोन जण जखमी झाले होते. उत्तर प्रदेशमधील आझमगड येथील रहिवासी असलेल्या खानला फेब्रुवारी २०१८ मध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती. २००८ साली घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर २०१८ मध्ये अटक केली होती. गेल्या आठवड्यात त्याला या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले होते. २००८ मध्ये दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेशात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा खान हा मुख्य सूत्रधार देखील आहे.

 

 

Web Title: 2008 Batla House Encounter: Indian Mujahideen terrorist Ariz Khan sentenced to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.