एटीएम कार्डची हातचालाखी करून २० हजार काढले, गुन्हा दाखल
By आशपाक पठाण | Updated: January 9, 2024 19:28 IST2024-01-09T19:27:24+5:302024-01-09T19:28:04+5:30
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएम कार्डची हातचालाखी करून २० हजार काढले, गुन्हा दाखल
लातूर : शहरातील बार्शी रोडवरील एसबीआय बँकेच्या शाखेजवळ ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून अज्ञात आरोपीने २० हजार रुपये काढून घेतल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले फिर्यादी सुरेश रामराव पांगारकर (वय ६८ रा. श्रीनगर, बार्शी रोड, लातूर) यांना एसबीआय बँकेच्या शाखेजवळ एकाने एटीएम कार्ड हातचलाखीने बदल केले. तसेच त्या एटीएम कार्डचा वापर करून बँक खात्यातील २० हजार रुपये काढून घेत फिर्यादीची फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरेश पांगारकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपो.फौ.देशमुख करीत आहेत.