गळफास घेऊन २० वर्षीय तरुणीची आत्महत्या; चंद्रपूरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 19:38 IST2021-04-03T19:37:42+5:302021-04-03T19:38:41+5:30
आत्महत्येचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झाले नसून भद्रावती पोलीस पुढील तपास करीत आहे.

गळफास घेऊन २० वर्षीय तरुणीची आत्महत्या; चंद्रपूरमधील घटना
चंद्रपूर : भद्रावती शहरातील बाजारपेठ येथे राहणाऱ्या कुमारीकेने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळ दरम्यान उघडकीस आली. याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
आरती जयप्रकाश चटपल्लीवार वय 20 वर्ष राहणार बाजार वार्ड असे आत्महत्या करणाऱ्या कुमारिकेचे नाव आहे . तिने आपल्या घरातील रूममध्ये छताला ओढनी बांधून गळफास घेतला. तिचे आईने रूममध्ये बघितले असता ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झाले नसून भद्रावती पोलीस पुढील तपास करीत आहे.