आसनगावात 20 वर्षीय युवतीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 20:10 IST2019-04-11T20:08:32+5:302019-04-11T20:10:25+5:30
गळफास घेऊन आत्महत्या केली.

आसनगावात 20 वर्षीय युवतीची आत्महत्या
ठळक मुद्देया बाबतची खबर मृत मुलीच्या आईने दिल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला या प्रकरणी पोलीस नाईक घुते तपास करीत असून आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
डहाणू/बोर्डी - वाणगाव पोलीस ठाण्याअंतर्गत आसनगाव येथील प्रज्ञा सतेंद्र पाटील या 20 वर्षीय युवतीने राहत्या घरी गुरुवार, 11 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबतची खबर मृत मुलीच्या आईने दिल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनाकरिता चिंचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलीस नाईक घुते तपास करीत असून आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.