शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

"मी माझ्या मुलाला विहिरीत फेकलंय..."; आईनंच केली २ वर्षाच्या मुलाची निर्दयी हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 13:34 IST

Murder Case : पाेलिसांनी आराेपी मातेला अटक केली आहे. नेमका हा प्रकार का घडला व त्याचे कारण काय, याचा तपास पाेलीस करीत आहेत.

निलंगा / केळगाव (जि. लातूर) : दाेन वर्षांच्या पाेटच्या चिमुकल्याला आईने विहिरीत फेकून दिल्याची हृदयद्रावक घटना साेमवारी उघडकीस आली आहे. दरम्यान, पाण्यात बुडाल्याने मुलाचा मृत्यू झाला असून, पाेलिसांनी आराेपी मातेला अटक केली आहे. नेमका हा प्रकार का घडला व त्याचे कारण काय, याचा तपास पाेलीस करीत आहेत.

पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील केळगावजवळील राठाेडा गावात रविवारी उशिरा हा प्रकार घडला. आराेपी माया व्यंकट पांचाळ (वय २५) हिला दाेन वर्षांचा संपत व्यंकट पांचाळ हा मुलगा हाेता. पती व्यंकट पांचाळ हे लातूर येथे एका खासगी कंपनीत नाेकरीला आहेत. रविवारी मुलगा घरात आढळून आला नाही. दरम्यान, घराशेजारी असलेल्या शिंदे यांच्या विहिरीत मुलाला आईनेच फेकून दिले. घटनास्थळी उपविभागीय पाेलीस अधिकारी दिनेशकुमार काेल्हे, पाेलीस निरीक्षक बी. आर. शेजाळ, पाेलीस उपनिरीक्षक गर्जे यांनी भेट दिली. व्यंकट विश्वनाथ पांचाळ यांच्या फिर्यादीवरून मयत बालकाची आई माया पांचाळ हिच्याविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेनं तिच्या दिराला सांगितले, मी पोराला विहिरीत फेकलं, पण दिरानं तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. पण संध्याकाळ झाली तरीही मुलगा दिसला नाही तेव्हा वहिणीने सांगितले दिराला आठवलं. त्यानंतर विहिरीत जवळ गेले असता तिथं मुलाचा मृतदेह सापडला. 

फेकण्याचे कारण समजेना...

आईनेच आपल्या दाेन वर्षांच्या मुलाला विहिरीत फेकल्याने पाेलीसही चक्रावून गेले आहेत. पतीने दिलेल्या फिर्यादीत, तसेच प्राथमिक माहितीमध्ये गुन्ह्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. पाेलिसांनी सांगितले, आराेपी महिलेची मानसिक स्थिती बरी नाही का? हे तपासात निष्पन्न हाेईल.

पती-पत्नीमध्ये सतत वाद...

पती व्यंकट पांचाळ आणि पत्नी माया पांचाळ यांच्यामध्ये सतत भांडण हाेत हाेते. दरम्यान, याच भांडणाच्या रागातून तिने आपल्या दाेन वर्षीय मुलाला विहिरीत फेकल्याचा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे. घटनेच्या आठ दिवसापूर्वीच दाेघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले हाेते. पती व्यंकट पांचाळ हा एका खासगी कारखान्यात वाॅचमन म्हणून काम करताे.

एकुलता एक मुलगा...

पांचाळ दाम्पत्यांना एकुलता एक मुलगा असल्याची माहिती समाेर आली आहे. केवळ दाेघांमध्ये हाेणाऱ्या सततच्या भांडणातून ही घटना घडल्याचा अंदाजही पाेलिसांनी वर्तविला आहे. घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पाेलीस करीत आहेत. पती औसा-लातूर येथे वास्तव्याला आहे. तर पत्नी माया ही राठाेडा गावात राहत हाेती. दरम्यान, तीने रविवारी रात्री उशिरा दाेन वर्षीय मुलाला शेजारच्या विहिरीत फेकले, असेही पाेलिसांनी सांगितले.

साेमवारी उघड झाली घटना...

घराशेजारीच असलेल्या शिंदे यांच्या विहिरीत एका चिमुकल्या मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. दरम्यान, याबाबतची माहिती निलंगा पाेलिसांना देण्यात आली. तातडीने पाेलीस घटनास्थळी दाखल झाले अन् पंचनामा करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आईनेही गुन्ह्याची कबुली दिली आहे, असे सहायक पाेलीस निरीक्षक अभिजित कुदळे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक