शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

By चैतन्य जोशी | Updated: June 28, 2025 13:33 IST2025-06-28T13:10:27+5:302025-06-28T13:33:38+5:30

शेताचा वाद, निमसडा गावात ‘डबल मर्डर’ आरोपी महेंद्रने साधना आणि तिचा मुलगा नितीन यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करत दोघांना खल्लास केले.

2 women murdered in Nimsada village in Wardha, accused commits suicide | शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

चैतन्य जोशी

वर्धा - शेतीच्या हिस्सेवाटणीच्या कारणातून झालेल्या वादात पुतण्याने माय-लेकाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना अल्लीपूर ठाण्यांतर्गत निमसडा गावात घडली. विशेष म्हणजे माय-लेकाची हत्या केल्यानंतर आरोपीनेही विष पिऊन आत्महत्या केली. ही थरारक घटना २८ रोजी सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास घडली. 

साधना सुभाष मोहिजे (४५ रा. निमसडा), नितीन सुभाष मोहिजे (२८ रा. निमसडा) अशी मृतांची नावे आहे. तर आरोपी असलेला पुतण्या महेंद्र भाऊराव मोहिजे (४७ रा. निमसडा) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत साधना आणि तिचा पुतण्या आरोपी महेंद्र यांच्यात शेतीचा वाद होता. याच वादातून २८ रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्याच शेतात तिघांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपी महेंद्रने साधना आणि तिचा मुलगा नितीन यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करत दोघांना खल्लास केले. या घटनेने अल्लीपूर गाव परिसरात मोठी खळबळ उडाली. 

घटनास्थळी पोलिस दल दाखल 
निमसडा गावात घटना घडताच घटनास्थळी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली. अल्लीपूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निमसडा गावात दाखल झाले होते. 

आरोपीची आत्महत्या 
आरोपी पुतण्या महेंद्र मोहिजे याने साधना व तिच्या मुलाला ठार मारल्यानंतर आरोपी महेंद्रने विष प्राशन केले. त्याला तत्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मात्र, त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण वर्धा जिल्ह्याला हादरा बसला आहे.

Web Title: 2 women murdered in Nimsada village in Wardha, accused commits suicide