शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन गंडा... एप इन्स्टॉल करायला लावत २ लाख ४५ हजारांची फसवणूक

By नितीश गोवंडे | Updated: April 6, 2023 19:37 IST

विठ्ठल धर्मु परामणे (५८, रा. कात्रज कोंढवा रोड) यांनी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून त्यांच्याच कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डवर १६ हजार ८३६ रुपये पाठवले होते

नितीश गोवंडेपुणे : दिवसेंदिवस ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत. विविध मार्गांचा अवलंब करत लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यामध्ये ज्येष्ठ व्यक्तींना फसवण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यातुलनेत फसवणुक झाल्यानंतर त्याची परतफेड पोलिसांकडून केली जाण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. अशाच पद्धतीने अेनिडेस्क अॅप इन्स्टॉल करायला लावून एका इसमाची २ लाख ४५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल धर्मु परामणे (५८, रा. कात्रज कोंढवा रोड) यांनी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून त्यांच्याच कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डवर १६ हजार ८३६ रुपये पाठवले होते. पण ते पैसे जमा न झाल्याने त्यांनी गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर (७९९७७१४०५७) शोधून त्यावर फोन केला. फोनद्वारे त्यांनी ट्रान्झेक्शन पूर्ण न झाल्याचे तसेच डेबिट झालेले पैसे पुन्हा क्रेडिट न झाल्याचे सांगितले. यावेळी फोनवर बोलण्यात गुंतवून समोरच्या व्यक्तीने त्यांना अेनिडेस्क अॅप इन्स्टॉल करायला लावले. त्यानंतर परामणे यांच्या कोटक बँकेतून ९० हजार आणि एचडीएफसी बँकेतून १ लाख ५४ हजार ५०० रुपये असे एकूण २ लाख ४५ हजार रुपये परस्पर काढून घेत त्यांची फसवणूक केली. यानंतर परामणे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ आणि सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी आलेल्या आर्जाची चौकशी करून याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास सांगितल्यावर ५ एप्रिल रोजी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पुराणिक करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसonlineऑनलाइन