शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
3
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
4
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
5
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
6
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
7
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
8
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
9
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
10
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
11
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
12
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
13
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
14
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
15
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
16
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
17
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
18
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
19
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

अशीही 'कंपनी'; मोबाईल चोरल्यास 2 दिवस सुट्टी अन् टार्गेट पूर्ण केल्यावर 500 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 11:31 AM

टोळीच्या म्होरक्याच्या चौकशीतून मिळाली चक्रावून टाकणारी माहिती

नई दिल्ली: बस प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या एका टोळीला दक्षिण दिल्लीतून पोलिसांनी अटक केली. या टोळीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना अतिशय चक्रावून टाकणारी माहिती मिळाली. आपली टोळी नसून कंपनी आहे आणि या कंपनीचा भाग असणाऱ्या सर्वांना अगदी मल्टीनॅशनल कंपनीप्रमाणे सुविधा दिल्या जातात, अशी माहिती टोळीच्या प्रमुखानं पोलिसांना दिली. टोळीतील प्रत्येकाला टार्गेट पूर्ण केल्यावर म्हणजेच मोबाईल चोरल्यावर दररोज वेतन दिलं जातं. याशिवाय आठवड्यातून दोन सुट्ट्यादेखील दिल्या जातात, अशी आपल्या कामाची पद्धत असल्याचं टोळीच्या प्रमुखानं पोलिसांना सांगितलं. 'प्रत्येकाला मोबाईल चोरण्याचं टार्गेट पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात येते. आठवड्यातून पाच दिवस काम करावं लागतं. शनिवार-रविवार सुट्टी असते. कंपनीत नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवसाला 500 रुपयांचा पगार दिला जातो. याशिवाय नॉन व्हेज आणि दारुदेखील देण्यात येते,' अशी माहिती टोळीचा प्रमुख असलेल्या सरदार चमल लालनं पोलिसांनी दिली. चमन लालचा उजवा हात असलेल्या बोपी विश्वासनं ओम प्रकाश आणि ज्ञानेश या दोघांना त्यांच्या कंपनीत नोकरी दिली होती. याशिवाय आणखीदेखील काहीजणांचा या कंपनीत समावेश असण्याची शक्यता आहे. ही टोळी महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये सर्वाधिक काम करायची. दिल्लीतल्या कोणत्याही भागातून ते मोबाईल लंपास करायचे. मात्र एमबी रोडपासून बदरपूर, कालका मंदिरपासून आनंदमयी रोड, आऊटर रिंग रोडवर धावणाऱ्या डीटीसी बसेसमध्ये सर्वाधिक चोऱ्या केल्या जायच्या. ही टोळी दिवसाकाठी सात ते आठ मोबाईल लंपास करायची, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

टॅग्स :MobileमोबाइलThiefचोर