शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

उधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 15:07 IST

बुधवार पेठेतील इलेक्ट्रोनिक्स बाजारपेठेत दुकान थाटून तेथील व्यापाऱ्यांकडून उधारीवर माल घेऊन तो विकून २ कोटी ४६ लाख रुपये न देता पती पत्नी फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़.

ठळक मुद्देफरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद, दुकानदार पत्नीसह फरार

पुणे : बुधवार पेठेतील इलेक्ट्रोनिक्स बाजारपेठेत दुकान थाटून तेथील व्यापाऱ्यांकडून उधारीवर माल घेऊन तो विकून २ कोटी ४६ लाख रुपये न देता पती पत्नी फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. प्रल्हाद लक्ष्मण हरियानी, जान्हवी हरियानी, सुनिल श्रीचंद हरियानी, अनिल श्रीचंद्र हरियानी (सर्व रा़. मीरा सोसायटी, शंकरशेठ रोड) अशी त्यांची नावे आहेत़. याप्रकरणी इंडियन केबल्स अँड इलेक्ट्रिकल्स प्रा.लि.चे मालक सुरेश शिवनदास जेठवानी (वय ५६, रा. कोरेगाव पार्क) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियानी यांचा इलेक्ट्रिक साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. जेठवानी बुधवार पेठ भागातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री बाजारातील मोठे व्यावसायिक आहेत. गेल्या आठ वर्षांपासून हरियानी यांनी त्यांच्याकडून लॉर्ड इलेक्ट्रीकल्स या फर्मचे नावावर १ कोटी ५३ लाख ४ हजार आणि जे़ पी़ इलेक्ट्रो इंटरप्रायझेस या फर्मच्या नावार ९३ लाख ८३ हजार रुपये असे २ कोटी ४६ लाख ८७ हजार रुपयांचे साहित्य घेतले होते. त्यासाठी त्यांनी पोस्ट डेटेड चेक्सही दिलेले आहेत़. उधारीवर घेतलेल्या साहित्याचे पैसे हरियानी यांनी चुकते केले नाही. याबाबत जेठवानी यांनी त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र, आरोपींकडून सबब सांगण्यात येत होते. या फर्म प्रल्हाद हरियानी यांच्या नावावर आहे़ मात्र, त्यांचे म्हणणे असे की फर्म जरी माझ्या नावावर असली तरी प्रत्यक्ष व्यवहार अनेक वर्षांपासून त्यांचे भाऊ पाहत आहेत़. त्याच्याशी माझा संबंध नाही़ ते व्यवहार आपण केले नाहीत़. दुसरीकडे त्याचे भाऊ गेल्या काही महिन्यांपासून दुकान बंद करुन पळून गेले आहेत़. शेवटी जेठवानी यांनी पोलिसांकडे धाव घेतली़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे अधिक तपास करत आहेत़.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी