आई बापासह २ लेकरांवर कुऱ्हाडीनं वार; सनकी युवकानं कुटुंब संपवलं, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 14:45 IST2022-11-04T14:44:55+5:302022-11-04T14:45:49+5:30

पीलवा गावातील ही घटना आहे. जिथे ३८ वर्षीय शंकर विश्नोई त्याचा भाऊ, आई वडील, पत्नी आणि मुलांसह शेतात राहत होता.

2 children with mother and father were attacked with an axe by Youth at Rajasthan | आई बापासह २ लेकरांवर कुऱ्हाडीनं वार; सनकी युवकानं कुटुंब संपवलं, त्यानंतर...

आई बापासह २ लेकरांवर कुऱ्हाडीनं वार; सनकी युवकानं कुटुंब संपवलं, त्यानंतर...

राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. याठिकाणी नशेत धुंद युवकानं संपूर्ण कुटुंबाला आयुष्यातून उद्ध्वस्त केले. त्यानंतर स्वत: पाण्याच्या टाकीत उडी मारून जीव दिला. या घटनेने गावात खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. सर्व मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवले असून या घटनेच्या तपासात पोलिसांना धक्का देणारं सत्य उघडकीस आले. 

पीलवा गावातील ही घटना आहे. जिथे ३८ वर्षीय शंकर विश्नोई त्याचा भाऊ, आई वडील, पत्नी आणि मुलांसह शेतात राहत होता. त्याला दारुचं व्यसन होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य त्रस्त झाले होते. पोलीस अधिकारी बद्री प्रसाद मीणा यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्यांना लिंबू पाण्यातून झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या होत्या. जेव्हा सर्व गाढ झोपेत होते तेव्हा युवकाने सर्वात आधी वडील सोनाराम विश्नोई यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर घरात आई चंपादेवी, १२ वर्षीय मुलगा लक्ष्मणवर हल्ला करत त्यांचा जीव घेतला. 

त्यानंतर पत्नीजवळ झोपलेल्या ८ वर्षीय लहान मुलाला उचलून पाण्याच्या टाकीत फेकलं. त्यानंतर घरातून बाहेर जात स्वत: पाण्याच्या टाकीत उडी घेत आत्महत्या केली. मृतकाच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, शंकरने बुधवारी रात्रीच कुटुंबाला संपवण्याचा घाट घातला होता. त्यासाठी त्याने सर्वांना झोपेच्या गोळ्या दिल्या. परंतु त्यारात्री कुटुंब जागेच होते. त्यानंतर गुरुवारी रात्री त्याने ३-३ गोळ्या दिल्या. त्यामुळे सर्व गाढ झोपेत गेले. या घटनेची माहिती जोधपूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकांना देण्यात आली. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 2 children with mother and father were attacked with an axe by Youth at Rajasthan