मित्रांनीच काढला काटा, काका पुतण्याची हत्या; छोटा भाऊ गंभीर जखमी
By सुरेंद्र राऊत | Updated: July 20, 2023 12:15 IST2023-07-20T08:42:52+5:302023-07-20T12:15:41+5:30
दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा गंभीर जखमी आहे. त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मित्रांनीच काढला काटा, काका पुतण्याची हत्या; छोटा भाऊ गंभीर जखमी
यवतमाळ : जिल्ह्यातील खुनाचे सत्र सलग सुरू आहे. यवतमाळ शहरात दोन घटना घडल्यानंतर बुधवारी रात्री पुसद शहर काका पुतण्याच्या हत्याकांडाने हादरले सोबत राहणाऱ्या मित्रांनीच हल्ला चढविला यात काका पुतण्या जागीच ठार झाले तर तिसरा गंभीर जखमी आहे.
राहुल हरिदास केवटे (45), क्रीश विलास केवटे(२०) दोघेही रा. इटावा वार्ड अशी मृतांची नाव आहे. तर दुसरा भाऊ बंटी हरिदास केवटे (२३) गंभीर जखमी आहे. ही थरकाप उडवणारी घटना बुधवारी रात्री बारा वाजता दरम्यान शहरातील इटावा वार्ड भागात घडली. आरोपी पवन वाळके, निलेश थोरात, गणेश तोडकर ,गणेश कापसे ,गोपाल कापसे, अवि चव्हाण यांच्यासोबत केवटे बंधूंचा वाद झाला होता. यातूनच पवन वाळके याने मित्रांना सोबत घेऊन तलवारीने हल्ला केला. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा गंभीर जखमी आहे. त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.