शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने १ लाख रुपये घेऊन फसवणूक; चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 13:03 IST

मुख्य आरोपी हा चंद्रकांत पाटलांच्या आवाजात बोलत दादांचा पीए आहे असे समोरच्याला सांगायचा.

ठळक मुद्देकोथरुड, अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने २ ते ३ लाख रुपयांची मागणी करुन १ लाख रुपये घेऊन फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी एका मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे़ 

सुरेश बंडु कांबळे, सौरभ आष्टी, किरण धन्यकुमार शिंदे, किरण शेंडगे (सर्व रा़ गंज पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

या प्रकरणी हरीविलास रामनाथ कासट (वय ९०, रा. हर्षल बंगला, कोथरुड) यांनी अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. एका डॉक्टरकडे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार सर्व प्रथम प्रकार घडला असून याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना पकडले आहे. स्वत: चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना कोथरुडमधील कासट यांच्या घरी घडला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कासट यांना १७ जुलै रोजी एक फोन आला. फोन करणार्‍याने मी आमदार चंद्रकांत पाटील बोलतोय. तुमच्या कोथरुड भागातून मी निवडुन आलोय. सध्या कोरोना महामारीच्या काळामध्ये मी खूप मदत कार्य केले असून या पार्श्वभूमीवर तुम्ही मला २ ते ३ लाख रुपयांची आर्थिक मदत द्या असे बोलणे करुन पैशांची मागणी केली. त्यानंतर त्याने साथीदारांना पाठवून १ लाख रुपये देण्यास भाग पाडले.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले की, विशाल शेंडगे हा चंद्रकांत पाटील यांच्या आवाजात बोलत असे. सुरेश कांबळे हा दादांचा पी ए सावंत बोलत असल्याचे सांगत. त्यांनी अनेक प्रतिष्ठितांना फोन करुन पैशांची मागणी केली. परंतु, त्यापैकी अनेकांना राजकीय नेते असे स्वत: फोन करुन मागणी करीत नसल्याचे माहिती असल्याने त्यांनी त्यांच्या फोनकडे दुर्लक्ष केले होते.

सौरभ आष्टी व किरण शिंदे हे दोघे रेकी करत. कासट यांना चंद्रकांत पाटील यांनीच पैसे मागितल्याचे खरे वाटले होते. त्यामुळे त्यांनी आॅफिसमध्ये क्लार्कला आलेल्या तरुणाकडे पैसे देण्यास सांगितले होते.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने कोणाकडे पैशांची मागणी झाली असेल तर त्यांनी कोथरुड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक