शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

गुजरात एटीएसची मोठी कारवाई! १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपीला पाकिस्तानी पासपोर्टसह अटक 

By पूनम अपराज | Published: February 10, 2020 5:41 PM

गुजरात एटीएसची मुंबईत कारवाई

ठळक मुद्देगेल्या वर्षीपासून १५०० कोटींचे ड्रग्स तस्करीप्रकरणी मुसा गुजरात एटीएसच्या रडारवर होता.  तो पाकिस्तानी पासपोर्टद्वारे प्रवास करत होता. तो दुबईला जाण्यासाठी निघाला असताना ही अटकेची कारवाई करण्यात आली. 

पूनम अपराज

मुंबई - गुजरातएटीएसने (दहशतवादविरोधी पथक)  मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुनाफ हलारी मुसाला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. ही कारवाई काल मुसा दुबईला जात असताना करण्यात आली असल्याची माहिती गुजरातएटीएसचे उपअधीक्षक के. के. पटेल यांनी दिली. पाकिस्तानी पासपोर्ट मुसाकडून हस्तगत करण्यात आला आहे. गेल्या वर्षीपासून १५०० कोटींचे ड्रग्स तस्करीप्रकरणी मुसा गुजरात एटीएसच्या रडारवर होता.  

१९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या मुसाला मुंबई विमानतळावरून अटक केली. १५०० कोटींच्या ड्रग्स तस्करी करणाऱ्या रॅकेटप्रकरणी तो गेल्या वर्षीपासून गुजरात एटीएसच्या रडारवर होता. आरोपी मुनाफ मुसा याला काल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. तो पाकिस्तानी पासपोर्टद्वारे प्रवास करत होता. तो दुबईला जाण्यासाठी निघाला असताना ही अटकेची कारवाई करण्यात आली. १९९३ मुंबई येथे झालेल्या साखळी  बॉम्बस्फोटामध्ये मुसा हा आरोपी आहे, या बॉम्बस्फोटात २६० लोकांचा मृत्यू तर आणि ७०० हून अधिक लोकं जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटानंतर तो देश सोडून पळून गेला आणि दक्षिण आफ्रिकेत लपला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी गुजरातच्या किनाऱ्यावर ९०० कोटी रुपयांचा ड्रग्स तस्करी केल्याप्रकरणी मुसा गुजरात एटीएसच्या रडारवर होता. ड्रग्स प्रकरणात गुजरात एटीएस त्याच्या भूमिकेची चौकशी करीत आहे, अशी एका अधिकाऱ्याने माहिती दिली. 

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसArrestअटकDrugsअमली पदार्थGujaratगुजरातMumbaiमुंबईAirportविमानतळ