स्फोटक पदार्थांपासून बनवत होता बेल्ट; ब्लास्टमुळे गेला हात, मसूद अझहरशी कनेक्शन असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 19:49 IST2025-09-17T19:43:57+5:302025-09-17T19:49:08+5:30

पंजाबच्या भठिंबामध्ये झालेल्या स्फोटानंतर अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.

19 year old student Gurpreet was caught in Bathinda while making explosives at home | स्फोटक पदार्थांपासून बनवत होता बेल्ट; ब्लास्टमुळे गेला हात, मसूद अझहरशी कनेक्शन असल्याचा संशय

स्फोटक पदार्थांपासून बनवत होता बेल्ट; ब्लास्टमुळे गेला हात, मसूद अझहरशी कनेक्शन असल्याचा संशय

Bathinda Blast: १० सप्टेंबर रोजी पंजाबच्या भटिंडाच्या जीदा गावात झालेल्या दोन स्फोटांमुळेपंजाब पोलिसांना एक धक्कादायक दहशतवादी कट उघडकीस आला आहे. १९ वर्षीय कायद्याचा विद्यार्थी असलेल्या गुरप्रीत सिंग हा जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील भारतीय लष्कराच्या ठिकाणावर आत्मघातकी हल्ल्याची तयारी करत होता. सर्वात हुशार आणि शांत विद्यार्थी  म्हणून ओळखला जाणारा गुरप्रीत सिंग आता दहशतवादी तपासाच्या केंद्रस्थानी आहे.

भटिंडा स्फोटाप्रकरणी पोलिसांनी गुरप्रीत सिंग या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्फोटात जखमी झालेला गुरप्रीत आणि त्याचे वडील जगतार सिंग यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिदा गावात झालेल्या स्फोटाची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून एनआयएचे पथक मंगळवारी भटिंडा येथे पोहोचले होते. एनआयएच्या पथकाने आरोपी गुरप्रीत सिंगची चौकशी केली असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

स्फोटासाठी बनवला बेल्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरप्रीत स्फोटक पदार्थांपासून एक बेल्ट बनवत होता, जो जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे नेणार होता. मात्र पहिला स्फोट १० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता झाला, ज्यामध्ये आरोपी गुरप्रीत सिंग स्वतः जखमी झाला. दुसरा स्फोट त्याच दिवशी दुपारी ४ वाजता झाला, ज्यामध्ये गुरप्रीत सिंगचे वडील जखमी झाले. दुसऱ्या दिवशी, ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुरक्षा यंत्रणांकडून स्फोटक पदार्थ काढत असताना आणखी एक स्फोट झाला. त्यानंतर चौथा आणि पाचवा स्फोट रविवारी झाला. 

पाच दिवसांत पाच स्फोट

सहा दिवसांनंतरही गुरप्रीत सिंगच्या घरात विखुरलेल्या स्फोटक पदार्थाची विल्हेवाट लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांनी स्फोटक पदार्थ नष्ट करण्यासाठी आणलेला रोबोट बिघडला आणि आता तो दुरुस्तीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांना गुरप्रीत सिंगच्या खात्याची माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस सूत्रांनुसार, स्फोटानंतर पिक्रिक अॅसिड (एक स्फोटक रासायनिक संयुग) असल्याचे मानले जाणारे पिवळे पावडर सापडले. गुरप्रीतच्या फोनवर पिक्रिक अॅसिडचे फोटो सापडले आहेत.  त्याने अनेक धोकादायक रसायने ऑनलाइन ऑर्डर केली होती आणि यूट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यानंतर ते मिसळून बॉम्ब तयार केला होता.

गुरप्रीतचा हातही कापला

हे स्फोटक एक हाय-डेफिनिशन ज्वलनशील पदार्थ आहे ज्याचा फक्त स्पर्शाने स्फोट होऊ शकतो. रासायनिक कणांचे विघटन करून ते नष्ट करण्यासाठी तज्ञ पथके काम करत आहेत. पण रासायनिक आणि स्फोटक पदार्थ तिथून काढून टाकण्यात अद्याप पूर्ण यश मिळालेले नाही. बॉम्ब बनवणाऱ्या गुरप्रीतचा हातही कापण्यात आला आहे. रसायनाची तीव्रता लक्षात घेता, पोलिसांनी जवळपासची चार घरे रिकामी केली आहेत.

मसूद अझहरशी कनेक्शन

या संपूर्ण प्रकरणात गुरप्रीतचे मोस्ट वॉन्टेड पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझहरशी संबंध असल्याचेही दिसून आलं आहे. गुरप्रीतने सांगितले की, "तो बारावीत वाणिज्य शाखेत शिकला होता, पण त्याला रसायनशास्त्रात जास्त रस होता आणि त्याला घरी प्रयोगशाळा सुरू करायची होता. युट्यूबवर स्फोटके बनवण्याचे व्हिडिओ पाहताना मला दहशतवादी मसूद अझहरचे व्हिडिओ दिसले. या व्हिडिओंमध्ये मसूद अझहर तरुणांना जिहादी बनण्यासाठी आणि त्याग करण्यास सांगत होता. त्या व्हिडिओंपासून प्रभावित झालो."

गुरप्रीतने दिलेल्या माहितीनुसार त्याला दररोज १०० रुपये पॉकेटमनी मिळत होते. या पैशांचा वापर करून आणि परदेशात राहणाऱ्या त्याच्या चुलत भावाकडून काही पैसे मागून त्याने ऑनलाइन रसायने मागवली होती. मात्र पंजाब पोलिसांना ही रसायने त्याला खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी किंवा मौलाना मसूद अझहरच्या दहशतवादी नेटवर्कशी जोडलेल्या स्लीपर सेलने पाठवल्याचा संशय आहे.

दरम्यान, गुरप्रीतच्या म्हणण्यानुसार, त्याने पिक्रिक अॅसिड, अमोनियम नायट्रेट, अमोनियम सल्फेट, शिसे नायट्रेट आणि फॉस्फरस पेंटॉक्साइड सारखी धोकादायक रसायने ऑनलाइन ऑर्डर केली होती.
 

Web Title: 19 year old student Gurpreet was caught in Bathinda while making explosives at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.