इमारतीवरून पडून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 22:55 IST2020-01-12T22:55:26+5:302020-01-12T22:55:37+5:30
खारघर पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

इमारतीवरून पडून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू
पनवेल :खारघर सेक्टर 35 मधील साइस्प्रिंग इमारतीच्या 13 व्या मजल्यावरून पडून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी खारघर मध्ये घडली. मयत तरुणीचे नाव गुरशरण कौर असे आहे.
या घटनेला खारघर पोलिसांनी दुजोरा दिला आहे. संबंधित मुलगी ही काळंबोली येथील रहिवासी आहे. साइस्प्रिंग इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. संबंधित घटना कशी घडली यासंदर्भात खारघर पोलीस चौकशी करीत आहेत.