गोरखपूर एक्सप्रेस ट्रेनच्या टॉयलेटमध्ये १९ वर्षाच्या मुलाने एका मुलीवर बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप पीडित मुलीने केला आहे. ठाणेरेल्वेपोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.बुधवारी १० फेब्रुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्याचे तक्रारीनुसार पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मुलाने मुलीला रेल्वेच्या शौचालयात नेऊन तेथे बलात्कार केला. त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे."मुलगी आणि मुलगा एकत्र फिरत होते. त्याने तिला शौचालयात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे मुंबईतील कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर तो गुन्हा आमच्याकडे वर्ग करण्यात आला," ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याचे एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये शौचालयात नेऊन १९ वर्षाच्या मुलानं केला तरूणीवर बलात्कार
By पूनम अपराज | Updated: February 14, 2021 20:53 IST
Rape Crime News : ठाणे रेल्वे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये शौचालयात नेऊन १९ वर्षाच्या मुलानं केला तरूणीवर बलात्कार
ठळक मुद्दे बुधवारी १० फेब्रुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्याचे तक्रारीनुसार पोलिसांनी सांगितले.