लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये शौचालयात नेऊन १९ वर्षाच्या मुलानं केला तरूणीवर बलात्कार

By पूनम अपराज | Published: February 14, 2021 08:52 PM2021-02-14T20:52:53+5:302021-02-14T20:53:32+5:30

Rape Crime News : ठाणे रेल्वे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

A 19-year-old boy took a girl to the toilet in a long-distance train and raped her | लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये शौचालयात नेऊन १९ वर्षाच्या मुलानं केला तरूणीवर बलात्कार

लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये शौचालयात नेऊन १९ वर्षाच्या मुलानं केला तरूणीवर बलात्कार

Next
ठळक मुद्दे बुधवारी १० फेब्रुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्याचे तक्रारीनुसार पोलिसांनी सांगितले.

गोरखपूर एक्सप्रेस ट्रेनच्या टॉयलेटमध्ये १९ वर्षाच्या मुलाने एका मुलीवर बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप पीडित मुलीने केला आहे. ठाणेरेल्वेपोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी १० फेब्रुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्याचे तक्रारीनुसार पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मुलाने मुलीला रेल्वेच्या शौचालयात नेऊन तेथे बलात्कार केला. त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"मुलगी आणि मुलगा एकत्र फिरत होते. त्याने तिला शौचालयात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे मुंबईतील कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर तो गुन्हा आमच्याकडे वर्ग करण्यात आला," ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याचे एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली. 

आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: A 19-year-old boy took a girl to the toilet in a long-distance train and raped her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.