तरुणाला नडला दुचाकीचोरीचा छंद, १९ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 01:42 AM2020-10-30T01:42:24+5:302020-10-30T01:42:42+5:30

Crime News : वसई तालुक्यातील पोलीस ठाण्यांत दररोज दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी येऊन गुन्हे दाखल होत होते. पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि वसई परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी दुचाकी चोरी झाल्याचे गुन्हे उघड करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते.

19-year-old accused in police custody | तरुणाला नडला दुचाकीचोरीचा छंद, १९ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात

तरुणाला नडला दुचाकीचोरीचा छंद, १९ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

नालासोपारा - विरारमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय आरोपी तरुणाला दुचाकी चालवण्याचा छंद अखेर नडला. त्याने चोरी केलेल्या दहा दुचाकी वसईच्या क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी जप्त केल्या असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. वसई तालुक्यातील पाच पोलीस ठाण्यांतर्गत लॉकडाऊनच्या काळात त्याने दुचाकी चोरल्याचे गुन्हे दाखल आहे.

वसई तालुक्यातील पोलीस ठाण्यांत दररोज दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी येऊन गुन्हे दाखल होत होते. पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि वसई परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी दुचाकी चोरी झाल्याचे गुन्हे उघड करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. वसईच्या क्राईम ब्रँचच्या पोलिसांना दुचाकी चोरणाऱ्याबद्दल माहिती मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस कर्मचारी सदर आरोपीवर पाळत ठेवून होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने  रेल्वे स्थानकांबाहेरील दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अमन रमजान शेख (१९) असे आरोपीचे नाव आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर यांनी सांगितले की, आरोपी हा एकटाच चोरी करायचा. आतापर्यंत १० दुचाकी मिळाल्या असून अजूनही मिळतील. आरोपीची आई जोगेश्वरी येथे राहत असून ती मध्यंतरी आजारी असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल होती. तिला भेटण्यासाठी आणि नशा करण्यासाठी हा दुचाकी चोरी करायचा. मुंबईला जाताना हा कोणती तरी दुचाकी चोरी करून घेऊन जायचा आणि तिचे पेट्रोल संपले की ती दुचाकी रस्त्यात सोडून दुसरी दुचाकी चोरी करून पुढे जायचा. गाड्या विकण्याचा त्याचा धंदा नव्हता. घाटकोपरच्या जेलमधून लॉकडाऊनच्या काळात सुटला होता. तो विरारला पत्नीसह राहतो. त्याच्यावर नालासोपारा, अर्नाळा, नवघर, विरार, तुळिंज या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. 

Web Title: 19-year-old accused in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.