शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चाेरीतील १९ माेटारसायकली जप्त; दाेघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 20:05 IST

Crime News : लातूर पाेलिसांची कारवाई : आकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देपाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यात विविध पाेलीस ठाण्याच्या हद्दितून माेठ्या प्रमाणावर माेटारसायकली पळविण्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत.

लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्याच्या हद्दितून पळविण्यात आलेल्या १९ माेटारसायकलींसह दाेघा चाेरट्यांच्या विशेष पाेलीस पथकाने सोमवारी मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत वेगवेगळ्या पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यात विविध पाेलीस ठाण्याच्या हद्दितून माेठ्या प्रमाणावर माेटारसायकली पळविण्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत. याबाबत त्या-त्या पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या विशेष पाेलीस पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे लातुरातील वसवाडी येथे सापळा लावण्यात आला. दरम्यान, अविनाश ऊर्फ बापू तानाजी येमगर (२७ रा. रामवाडी ता. जि. उस्मानाबाद), मच्छिंद्र दत्तात्रय क्षीरसागर (२५ रा. किल्लारी ता. औसा ह. मु. वाल्मिकनगर, लातूर) यांना चाेरीतील दाेन माेटारसायकलसह रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. दाेघांचीही झाडाझडती घेत अधिक चाैकशी करण्यात आली असता, लातूर, मुरुड आणि औसा पाेलीस ठाण्याच्या हद्दितून माेटारसायकली चाेरल्याची कबुली केली. त्यांच्याकडून १९ माेटारसायकली असा एकूण ११ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील आराेपींची अधिक विश्वासात घेत चाैकशी केली असता, तुकाराम मनाेहर कुंभार (रा. हासेगाव ता. औसा), सुनील ऊर्फ बाळा वसंत काळपे (रा. तेर जि. उस्मानाबाद) हे आपले इतर दाेन साथीदार असल्याचे सांगितले. या माेटारसायकली चाैघांच्या टाेळीने चाेरल्याचे समाेर आले आहे. उर्वरित दाेघाच्या अटकेसाठी पाेलीस प्रयत्नशील आहेत. 

याबाबत लातुरातील एमआयडीसी, विवेकानंद चाैक, शिवाजीनगर, मुरुड आणि औसा पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. ही कारवाई पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या विशेष पथकातील पाेलीस उपनिरीक्षक किरण पठारे, सहायक पाेलीस उपनिरीक्षक वाहिद शेख, पाेहेकाॅ. रामचंद्र ढगे, पाे.ना. महेश  पारडे, पाे.ना. अभिमन्यू साेनटक्के, पाेकाॅ. गणेश माेरे, पाेकाॅ. साेमनाथ खडके यांनी केली आहे. या टाेळीची व्याप्ती वाढविण्याची शक्यता पाेलीस सूत्रांनी वर्तविली आहे.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरीlaturलातूरPoliceपोलिस