टाकळीत काठी, राॅडने मारहाण झालेल्या युवकाचा दाेन महिन्यानंतर मृत्यू; सहा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 23:25 IST2025-01-06T23:25:02+5:302025-01-06T23:25:02+5:30
एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल...

टाकळीत काठी, राॅडने मारहाण झालेल्या युवकाचा दाेन महिन्यानंतर मृत्यू; सहा जणांना अटक
राजकुमार जाेंधळे
लातूर - एका १८ वर्षीय युवकाला काठी, राॅडने जबर मारहाण केल्याची घटना २७ ऑक्टाेबर २०२४ मध्ये टाकळी (ता. लातूर) येथे घडली हाेती. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात सह जणांविराेधात गुन्हा दाखल केला हाेता. दरम्यान, मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेला युवक माऊली साेट याचा साेमवारी मृत्यू झाला.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी उमाकांत साेट (वय ५२) यांनी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. २७ ऑक्टाेबर राेजी मी आणि पत्नी अर्चना, मुलगा माऊली साेट यास गावातील गाेविंद डुरे, गाेपाळ डुरे, कमलाकर डुरे, मनाेज डुरे, कुमार उफाडे, ओमकार खेडकर यांनी संगणमत करुन लहान मुलगा माऊली साेट याला घराच्या बाहेर बाेलावून घेतले. यावेळी काठी, लाेखंडी राॅडसह इतर हत्याराने जबर मारहाण केली. यामध्ये मारहाणीत माऊली साेट गंभीर जखमी झाला. त्याचे हात-पाय फ्रॅक्चर झाले. डाेक्यात जबर मार लागल्याने ताे जागीच बेशुद्धावेस्थत काेसळला. शिवाय, आमच्या विराेधात पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीस तर जीवे मारु, अशी धमकी दिली.
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील सहा जणांना पाेलिसांनी अटक केली असून, सध्या हे आराेपी जिल्हा कारागृहातील काेठडीत आहेत, अशी माहिती तपासाधिकारी सहायक पाेलिस निरीक्षक सचिन द्राेणाचार्य यांनी दिली.
मारहाणीतील जखमी युवकाची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली
ऑक्टाेबरमध्ये केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी युवक माऊली साेट याची दाेन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरु असलेली मृत्यूशी झुंज साेमवारी पहाटे संपली. त्याच्यावर लातुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले हाेते. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती एमआयडीसी पाेलिसांनी दिली.
पाेलिस बंदाेबस्तामध्ये झाले मयत युवकावर अंत्यसंस्कार
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात २७ ऑक्टाेबर २०२४ राेजी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला हाेता. दरम्यान, साेमवारी जखमी माऊली साेट या युवकाचा मृत्यू झाला. पाेलिसांनी आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पाेलिस निरीक्षक सुधाकर देडे यांनी दिली.