लघुशंकेसाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणीवर बलात्कार; जालनामधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 13:12 IST2022-03-29T13:09:21+5:302022-03-29T13:12:38+5:30

या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे. 

18-year-old girl raped in Jalna | लघुशंकेसाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणीवर बलात्कार; जालनामधील धक्कादायक प्रकार

लघुशंकेसाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणीवर बलात्कार; जालनामधील धक्कादायक प्रकार

जालना- लघुशंकेसाठी रात्री घराबाहेर गेलेल्या १८ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालनामधील भोकरदन तालुक्यातील टाकळी हिवर्डी येथे ही घटना घडली आहे. समाधान पालोदे असं बलात्कारी आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे. 

टाकळी हिवर्डी येथील १८ वर्षाची तरुणी लघुशंकेसाठी घराच्या पाठीमागील बाजूस गेलेली असताना आरोपी समाधान पालोदे याने या तरुणीला उचलून घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडित तरुणीने आरडाओरड केल्यानं तिची आई, भाऊ हे घटनास्थळावर येताच त्यांनी आरोपीला पकडले. मात्र, तो पळून गेला. 

सदर घटनेनंतर पीडित तरुणीसह तिच्या नातवाईकांनी हसनाबाद पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात रितसर तक्रार दिली. या तक्रारीवरून हसनाबाद पोलिसांनी आरोपी समाधान पालोदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपी फरार आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत, अशी माहिती हसनाबाद पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक संतोष घोडके यांनी दिली. 

Web Title: 18-year-old girl raped in Jalna