प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी प्रेयसीनं अख्ख्या कुटुंबाचा जीव धोक्यात घातला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 16:58 IST2021-09-19T16:57:10+5:302021-09-19T16:58:25+5:30

सचिन आणि खुशबू या दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. खुशबूचे आई-वडील तिच्या प्रेमाविरोधात होते कारण ती अल्पवयीन होती.

18-year-old girl poisons family to elope with lover in Surat | प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी प्रेयसीनं अख्ख्या कुटुंबाचा जीव धोक्यात घातला अन्...

प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी प्रेयसीनं अख्ख्या कुटुंबाचा जीव धोक्यात घातला अन्...

ठळक मुद्दे२ वर्षापूर्वी सचिनसोबत प्रेयसी पळाली होती परंतु तिला परत आणण्यात आलं१२ सप्टेंबरला आई-वडिलांना बेशुद्ध करुन घरातून पळून जाण्याची योजना दोघांनी आखलीदुसऱ्या दिवशी जेव्हा कुटुंबातील सदस्यांना जाग आली तेव्हा मुलगी बेपत्ता झाल्याचं पाहून त्यांना धक्का बसला.

सूरत – शहरात एका १८ वर्षीय मुलीवर कुटुंबातील सदस्यांना विष देऊन प्रियकरासोबत पळून जाण्याचा आरोप लावण्यात आला आहे. खुशबू असं या मुलीचं नाव आहे. १० वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रेयसीचा प्रियकर नवरा हा बेरोजगार आहे. प्रियकराच्या पित्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तर खुशबू आणि सचिन दोघंही फरार आहेत. सूरतमध्ये एकाच इमारतीत सचिन आणि खुशबू राहत होते.

सचिन आणि खुशबू या दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. खुशबूचे आई-वडील तिच्या प्रेमाविरोधात होते कारण ती अल्पवयीन होती. २ वर्षापूर्वी सचिनसोबत प्रेयसी पळाली होती परंतु तिला परत आणण्यात आलं. तिचं कुटुंब तिला घेऊन दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालं. टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, खुशबूनं सचिनसोबत नातं कायम ठेवत त्याच्याशी लग्न करण्यासाठी वयात येण्याची वाट पाहत होती. खुशबूच्या १८ व्या वाढदिवसाच्या २ दिवसांनीच प्रियकर सचिनसोबत पळून जाण्याचा प्लॅन तिने रचला.

१२ सप्टेंबरला आई-वडिलांना बेशुद्ध करुन घरातून पळून जाण्याची योजना दोघांनी आखली. त्यासाठी खुशबूनं जेवणात नशेचं औषध टाकून पराठा कुटुंबातील सदस्यांना खायला दिला. जेवण झाल्यानंतर आई-वडील आणि भाऊ बेशुद्ध झाला तेव्हा सचिनचे वडील अशोक आणि सचिन दोघंही खुशबूला घेऊन जाण्यासाठी आले. त्यानतंर ती सचिनसोबत पळाली. दुसऱ्या दिवशी जेव्हा कुटुंबातील सदस्यांना जाग आली तेव्हा मुलगी बेपत्ता झाल्याचं पाहून त्यांना धक्का बसला. त्यानंतर तात्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.

सचिन आणि खुशबू दोघांनी पळून जाऊन लग्न केले. त्यानंतर लग्नाचं रजिस्ट्रेशन घेऊन ते पोलीस ठाण्यात पोहचले. दोघंही कळते असल्यानं पोलिसांनी त्यांना जाऊन दिलं. त्यानंतर वंजारा, त्यांची पत्नी आणि भाऊ यांची अवस्था बिघडल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ठीक झाल्यानंतर वंजारा यांनी सचिन, अशोक आणि खुशबूविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. जेवणातून विष देऊन जीव घेण्याचा प्रयत्न करण्याची तक्रार खुशबूच्या घरच्यांनी दिली होती.

Web Title: 18-year-old girl poisons family to elope with lover in Surat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.