घोड्यांच्या शर्यतीवर अनधिकृत बेटिंग लावणाऱ्या १८ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 06:56 IST2018-12-23T06:55:54+5:302018-12-23T06:56:02+5:30
महालक्ष्मी रेसकोर्समध्ये शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी रेसकोर्स बेटिंगच्या २१ स्टॉल्सवर छापा टाकून १८ स्टॉलमालकांना अटक केली.

घोड्यांच्या शर्यतीवर अनधिकृत बेटिंग लावणाऱ्या १८ जणांना अटक
मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्समध्ये शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी रेसकोर्स बेटिंगच्या २१ स्टॉल्सवर छापा टाकून १८ स्टॉलमालकांना अटक केली. त्यांच्याकडून १ कोटी ५४ लाख १९ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स येथील घोड्यांच्या शर्यतीवर बेटिंग लावणारे काही स्टॉल्स मालक रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबमधील काही अधिकाºयांच्या संगनमताने बेटिंगमध्ये स्वीकारलेल्या रकमेच्या खोट्या नोंदी करून शासनाचा कोट्यवधीचा कर चुकवत असल्याची माहिती परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्तांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी बेटिंगच्या २१ स्टॉल्सवर छापा टाकून ही कारवाई केली.