१८ लाखांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:20 IST2018-10-16T23:20:30+5:302018-10-16T23:20:45+5:30

मनोर : मुंबई अहमदाबाद महामार्गावर हलोली गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी सहा वाजता पालघरच्या पोलीस अधीक्षकांच्या पथकाने १८ लाख रु ...

18 lakhs of gutkha caught | १८ लाखांचा गुटखा पकडला

१८ लाखांचा गुटखा पकडला

मनोर : मुंबई अहमदाबाद महामार्गावर हलोली गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी सहा वाजता पालघरच्या पोलीस अधीक्षकांच्या पथकाने १८ लाख रु पयांचा गुटखा टेम्पो सहीत जप्त केला आहे आरोपी विष्णू सिंग यास अटक केली आहे.


मुंबई अहमदाबाद महामार्गावर सध्या गुटखा पकडण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली असून पोलीस अधीक्षक पालघर यांच्या पथकातील पोलीस ज्ञानदेव सुर्यवंशी, प्रकाश कदम, मयूर बगल व इतर पोलिसांनी सकाळी सहाच्या सुमारास हलोली जवळ मुंबईच्या दिशेने जाणारा एक टेम्पो अडविला. त्याची तपासणी केली असता त्या मध्ये रजनीगंधा गुटखा, पानमसाला असे एकूण १८ लाख रुपयाचा मुद्देमाल पकडला. तसेच वाहतूक करणारा ७ लाखांचा टेम्पो ही जप्त केला. आरोपी विष्णू सिंग (२२ रा सुरत यास अटक केली आहे. मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यामधील अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत

Web Title: 18 lakhs of gutkha caught