१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 21:24 IST2025-08-21T21:23:30+5:302025-08-21T21:24:00+5:30

इटारसी स्टेशनला पोहचण्यासाठी पूर्वी अर्चना तिवारीने स्वत:चा लूक बदलला. त्यानंतर ती स्टेशनला उतरली.

18 km distance, 20 minutes time...Archana Tiwari changes her look in film style, caught on CCTV at itarsi station | १८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद

१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद

भोपाळ - १३ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली अर्चना तिवारी आता तिच्या कुटुंबाकडे सुखरूप पोहचली आहे. मात्र या प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही आता समोर आला आहे. त्यात अर्चना तिवारीनं रचलेल्या कटाची सुरुवात नर्मदापुरम रेल्वे स्टेशनवरून झाली. याच स्टेशनवर तिचा मित्र तेजेंदर सिंह कपडे घेऊन ट्रेनमध्ये चढला होता. कपडे मिळताच अर्चनाने ट्रेनमध्ये झटपट कपडे बदलले आणि इटारसी स्टेशनला तेजेंदर सिंहसोबत खाली उतरली. 

ट्रेनमध्ये बदलला लूक

इटारसी स्टेशनला पोहचण्यासाठी पूर्वी अर्चना तिवारीने स्वत:चा लूक बदलला. त्यानंतर ती स्टेशनला उतरली. जीआरपीला तपासात नर्मदापुरम आणि इटारसी स्टेशनवरील फुटेज सापडले. त्यातूनच तपासाला वेग आला आणि या षडयंत्राचा खुलासा झाला. नर्मदापुरम रेल्वे स्टेशनहून इटारसी जवळपास १८ किमी दूर आहे. इथं पोहचण्यासाठी २० मिनिटांचा अवधी लागतो. नर्मदापुरम ते इटारसी या स्टेशनमध्ये फक्त २० मिनिटांच्या वेळेत अर्चना तिवारीने स्वत:चा लूक बदलला. जेणेकरून ती कुणालाही ओळखता येऊ नये. 

ट्रेन येण्यापूर्वी तेजेंदर पोहचला...

जीआरपीनं दिलेल्या माहितीनुसार, तेजेंद्रर ट्रेन येण्यापूर्वीच नर्मदापुरम स्टेशनला पोहचला होता. तो २ नंबर प्लॅटफॉमवर ट्रेन बी ३ कोचसमोर उभा होता. त्याच्या हातात एक थैली होती. तेजेंदर पळत बोगीजवळ गेला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी अर्चना प्लॅटफॉर्मवर बोगीतून बाहेर पडली नाही. तेजेंद्रर ट्रेनमध्ये बसला आणि इटारसीपर्यंत गेला. या २० मिनिटांच्या प्रवासात अर्चनाच्या तिच्या अंगावरील पंजाबी ड्रेस काढून त्याऐवजी साडी घातली. 

इटारसी स्टेशनला दोघे उतरले...

इटारसी स्टेशनला ट्रेन पोहचली तेव्हा अर्चना आणि तेजेंदर तिथे उतरले आणि स्टेशनबाहेर पडले. जीआरपीच्या टीमने नर्मदापुरम आणि इटारसी दोन्ही स्टेशनवरील सर्व सीसीटीव्ही फुजेट तपासले. नर्मदापुरम येथे तेजेंद्रर ट्रेनच्या बोगीत चढताना दिसला. त्यानंतर इटारसी स्टेशनला प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ब्रीजजवळ जाताना तेजेंदर आणि अर्चना सोबत जाताना दिसले. या फुटेजमध्ये दोघांचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी नर्मदापुरम आणि इटारसी स्टेशनवरील तेजेंदरचा फुटेज मिळतेजुळते निघाले. इटारसीत राहणारा तेजेंदरला नर्मदापुरम आणि इटारसी रेल्वे स्टेशनवरील सर्व कॅमेऱ्याची माहिती होती. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून त्याने वाचण्याचा प्रयत्न केला परंतु काही ठिकाणी तो ट्रेस झाला. 

Web Title: 18 km distance, 20 minutes time...Archana Tiwari changes her look in film style, caught on CCTV at itarsi station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.