मद्यपी चालकांवर कारवाईचा धडाका, आठ महिन्यांत १७१३ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 01:54 AM2019-09-29T01:54:47+5:302019-09-29T02:03:27+5:30

मद्यपान करून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यानुसार मागील आठ महिन्यांत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या १७१३ कारवाई करण्यात आल्या आहेत.

1713 Drunk And Drive Case register in Navi Mumbai | मद्यपी चालकांवर कारवाईचा धडाका, आठ महिन्यांत १७१३ जणांवर गुन्हे दाखल

मद्यपी चालकांवर कारवाईचा धडाका, आठ महिन्यांत १७१३ जणांवर गुन्हे दाखल

googlenewsNext

नवी मुंबई : मद्यपान करून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यानुसार मागील आठ महिन्यांत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या १७१३ कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून २६ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड उकळण्यात आला आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून होताना दिसत आहे. त्याकरिता बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केल्या जात आहेत. त्यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवरही अंकुश ठेवला जात आहे. मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघात घडून वाहनचालकासह इतर पादचारी अथवा वाहनचालकांच्याही जीविताला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांचा शोध घेऊन कारवाई केल्या जात आहेत. त्यानुसार चालू वर्षात मागील आठ महिन्यांत एक हजार ७१३ जणांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक ३५० कारवाई जानेवारी महिन्यात केल्या आहेत. त्यामध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणाºयांचा मोठा समावेश आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात जमा झालेली दंडाची रक्कमही सर्वाधिक असून, ती आठ लाख ९०० रुपये इतकी आहे.


वाढत्या अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी वाहनचालकांमध्ये शिस्त लावण्यासंबंधीच्या न्यायालयाच्या सूचना आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून वाहनचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली जात आहे. तर महाविद्यालयीन तरुणांनाही शिस्तीचे महत्त्व पटवून दिले जात आहे. मात्र, त्यानंतरही सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे प्रकार शहरात दिसून येत आहेत. अनेकदा त्यांच्याकडून वाहतूक पोलिसांसोबतही वाद घातले जातात, त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या मदतीला स्थानिक पोलिसांचाही बंदोबस्त घेतला जात आहे. तर काही महिन्यांपूर्वी बेशिस्त वाहनचालकांचे चालक परवाने रद्द करण्याचीही मोहीम पोलिसांनी राबवली. मात्र, ठरावीक कालावधीनंतर त्यात खंड पडल्याने शहरातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावू शकलेली नाही. परिणामी, चौकाचौकांमध्ये वाहनचालकांच्या बेशिस्तपणाचे दर्शन घडत असून, त्यात दुचाकीस्वारांसह रिक्षाचालकांची संख्या मोठी दिसत आहे. मागील दोन वर्षांत शहरातील रस्ते अपघातांच्या संख्येचा आलेख वाढत चालला आहे. २०१७ मध्ये ६२२ अपघात घडले होते, तर २०१८ मध्ये ७६७ रस्ते अपघात घडले आहेत. त्यामागे रस्त्यावरील खड्ड्यांपाठोपाठ मद्यपान करून वाहन चालवल्याचे कारण वेळोवेळी समोर आलेले आहे. यामुळे ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाईत सातत्य राखले जाण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.

Web Title: 1713 Drunk And Drive Case register in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.