शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

आत्महत्येपूर्वी १७ वर्षीय मुलीचं बॉयफ्रेंडला पत्र; “जान, मी कुठेही बिझी नव्हते, मी तुझीच आहे पण...”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 10:18 AM

शिवानी लहानपणापासून बेगुसराय जिल्ह्यातील लखमिनिया येथे तिच्या आजीच्या घरी राहते. काही दिवसांपूर्वीच ती ननिहालला तिच्या घरी परतली होती.

ठळक मुद्देMy Lovely All Family मी कुणालवर मनापासून प्रेम करते. तुम्हाला तो आवडत नाही. मला संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं होतं. मी तुम्हाला खूप त्रास दिलाअमृता आज मी माझ्या प्रेमाला, कुटुंबाला केवळ तुझ्यामुळे आणि अमनमुळे सोडत आहे.

भागलपूर – बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात सुल्तानगंज परिसरातील किराणा दुकानदाराच्या १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईट नोट लिहिली होती. त्यात तिने तिचा बॉयफ्रेंड, मैत्रिण आणि कुटुंबासोबत तिच्या मनातील वेदना सांगितल्या आहेत. मृत तरूणीचं नाव शिवानी आहे. तिने सुसाईड नोटमध्ये कुणाल, मैत्रिण अमृता आणि कुटुंबासाठी हे पत्र लिहिलं आहे.

शिवानीने सुसाईड नोटमध्ये जे लिहिलंय त्यावरून कळतं की, तिच्या आयुष्यात १६ फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी आणि १२ मार्च सर्वात वाईट दिवस होते. ती म्हणते की, अमृता आज मी माझ्या प्रेमाला, कुटुंबाला केवळ तुझ्यामुळे आणि अमनमुळे सोडत आहे. तुझ्यामुळेच सर्व माझ्याकडे संशयाने पाहत होते. अमन आणि अमृताचा बॉयफ्रेंड होता. शिवानीने सांगितले की, जान, मी कुठेही बिझी नव्हते तर माझा फोन या मुलीने(अमृता) घेतला होता. कारण ती अमनसोबत बोलू शकेल. मी तुझीच आहे, आणि कायम तुझीच राहणार आहे. I Love You. मी तुझ्यावर खूप प्रेम करते असं शिवानीने म्हटलं आहे.

त्यानंतर शिवानीने सुसाईड नोटमध्ये कुटुंबाबद्दल लिहिलंय की, My Lovely All Family मी कुणालवर मनापासून प्रेम करते. तुम्हाला तो आवडत नाही. परंतु मला संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं होतं. मी तुम्हाला खूप त्रास दिला. आता यापुढे नाही करणार. सर्व आनंदात राहा. तुमची शिवानी असं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. अतिघाईमध्ये लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही वाक्य अर्धवट सोडली आहेत. कदाचित गळाफास घेण्यापूर्वी रूमममध्ये कोणी येण्याची भीती शिवानीच्या मनात होती. शिवानी लहानपणापासून बेगुसराय जिल्ह्यातील लखमिनिया येथे तिच्या आजीच्या घरी राहते. काही दिवसांपूर्वीच ती ननिहालला तिच्या घरी परतली होती. शिवानीच्या वडिलांचे किराणा मालाचं दुकान आहे.

अंघोळीच्या बहाण्याने रुममध्ये गेली गळफास घेतला

गुरुवारी दुपारी १२ च्या आसपास शिवानी अंघोळीच्या बहाण्याने दुसऱ्या मजल्यावर गेली. परंतु दीड तास उलटले तरी परतली नाही. त्यावेळी दुकानात तिची आई, छोटा भाऊ आणि बहीण होते. आईने तिच्या छोट्या बहिणीला शिवानीकडे पाठवले. तेव्हा बहिणीने आवाज दिला तरी आतमधून दरवाजा उघडला नाही. बहिणीने ही गोष्ट आईला सांगितली. त्यानंतर सर्वजण तिथे पोहचले. दरवाजा तोडला तेव्हा आतमधील दृश्य पाहून सगळ्यांना धक्का बसला. शिवानीने गळफास घेतला होता. त्यानंतर ही माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. घटनास्थली पोलीस पोहचल्यानंतर त्यांनी तपासाला सुरूवात केली.  

टॅग्स :Policeपोलिस