ब्राह्मण मुलीसाठी 16 लाख, OBC साठी 12 लाख, तर SC-ST साठी...! छांगूर बाबाचं धर्मांतरण 'रेट कार्ड' बघून तुमची झोप उडेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 23:59 IST2025-07-10T23:57:39+5:302025-07-10T23:59:26+5:30
छांगूरने ब्राह्मण, क्षत्रिय, ओबीसी-एससी-एसटीनुसार, हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी रेट कार्डदेखील तयार केले होते. एखाद्या हॉटेलच्या रेट कार्डप्रमाणेच धर्मांतराणाचे रेटकार्ड तुम्ही कधी ऐकले अथवा बघितले नसेल. छांगूर उर्फ जलालुद्दीनच्या नेटवर्कने ब्राह्मण मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतरण करण्यासाठी १५ ते १६ लाख रुपयांचा दर निश्चित केला होता...

ब्राह्मण मुलीसाठी 16 लाख, OBC साठी 12 लाख, तर SC-ST साठी...! छांगूर बाबाचं धर्मांतरण 'रेट कार्ड' बघून तुमची झोप उडेल!
उत्तर प्रदेशात धर्मांतरण रॉकेट चालवणारा ७८ वर्षीय धंधेबाज छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन सध्या जबरदस्त चर्चेत आहे. त्याच्या आलिशान कोठीवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. याचवेळी अनेक धक्कादायक खुलासेही समोर येत आहेत. या रॅकेटमध्ये नसरीन नावाची एक तरुणीही आहे. जी कधी काळी सिंधी हिंदू होती.
हिंदू मुलींना प्रेमाच्या आणि आमिषाच्या जाळ्यात खेचून त्यांना मुस्लीम बनवणाऱ्या, एका मोठ्या धार्मिक रॅकेटचा मास्टरमाइंड असलेल्या छांगूरने सर्वप्रथम हिला आणि हिच्या पतिलाच धार्मिक जाळ्यात अडकवले आणि हिला नीतूचे नसरीन बनवले. यानंतरच्या धर्मांतराच्या खेळात ही नसरीनच छांगूरचा सर्वात मोठा मोहरा बनली. हीच हिंदू मुलींना फसवून छांगूरकडे आणायची आणि नंतर त्यांचेही धर्मांतर करायची. आता या छांगूर बाबाचं धर्मांतरण 'रेट कार्ड'ही समोर आलं आहे.
ब्राह्मण मुलीच्या धर्मांतरासाठी १५ ते १६ लाख रुपये... -
छांगूरने ब्राह्मण, क्षत्रिय, ओबीसी-एससी-एसटीनुसार, हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी रेट कार्डदेखील तयार केले होते. एखाद्या हॉटेलच्या रेट कार्डप्रमाणेच धर्मांतराणाचे रेटकार्ड तुम्ही कधी ऐकले अथवा बघितले नसेल. छांगूर उर्फ जलालुद्दीनच्या नेटवर्कने ब्राह्मण मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतरण करण्यासाठी १५ ते १६ लाख रुपयांचा दर निश्चित केला होता. याशिवाय क्षत्रिय राजपूत मुलींना मुस्लीम बनवण्यासाठीही त्याने १५ ते १६ लाख रुपये दर निश्चित केला होता.
OBC प्रवर्गातील हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी 10 ते 12 लाख फिक्स -
याशिवाय, जर कुणी मागास जातीतील अर्थात ओबीसी प्रवर्गातील हिंदू मुलीचे इस्लाममध्ये धर्मांतरण केले, तर त्यासाठी त्याला १० ते १२ लाख रुपये दर निश्चित करण्यात आला होता. जर कोणी इतर हिंदू जातीतील अर्थात एससी-एसटी प्रवर्गातील मुलींचे धर्मांतरण केले तर त्याचा दर ८ ते १० लाख रुपये ठेवण्यात आला होता. अशा प्रकारे धर्मांतराचे रेट कार्ड, ही धक्कादायक गोष्ट आहे.
या रेट कार्डवरून प्रश्न निर्माण होतो की, या छांगूरला हिंदूंच्या धर्मांतरासाठी असा किती परदेशी निधी मिळत होता? याच निधूतून त्याने दर्ग्याजवळच कोट्यवधींचे हिंदू धर्मांतराचे बेकायदेशीर हेडक्वार्टर उभारले होते का?
3 ते 4 हजार हिंदूंची लिस्टही तयार होती -
माध्यमांतील वृत्तांनुसार, छांगूरच्या धर्मांतर टोळीने ३ ते ४ हजार हिंदूंची यादीही तयार केली होती. जे सॉफ्ट टार्गेट होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे, जवळपास ४० हिंदूंचे आधीच धर्मांतर केल्याचा दावाही केला जात आहे. हिंदू धर्मांतराच्या या खळबळजनक प्रकरणात ९ आरोपी आहेत. मात्र अद्याप केवळ ४ जणांनाच अटक करण्यात आली आहे. यूपी एटीएसने नोव्हेंबर २०२४ मध्ये छांगूरविरुद्ध एफआयआर दाखल केला होता, मात्र अटक ५ जुलै रोजी करण्यात आली. अट करण्यात आली, तेव्हा छांगूर आणि नसरीन लखनऊमधील स्मार्ट रूम हॉटेलमध्ये वडील आणि मुलगी असल्याचे भासवून लपून बसले होते.