जन्मदात्यानेच केले १५ वर्षीय मुलीवर अत्याचार; आधी दोन्ही हात बांधले, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 06:57 IST2023-05-02T06:51:33+5:302023-05-02T06:57:00+5:30

सेनगाव येथील ५५ वर्षीय व्यक्तीच्या पत्नीने आत्महत्या केल्याने मुलगी मामाकडे राहण्यास गेली होती. इकडे त्या व्यक्तीने दुसरे लग्न केले. मात्र, दुसऱ्या पत्नीसोबत पटले नसल्याने ती सोडून गेली.

15-year-old girl molested by father at Hingoli | जन्मदात्यानेच केले १५ वर्षीय मुलीवर अत्याचार; आधी दोन्ही हात बांधले, मग...

जन्मदात्यानेच केले १५ वर्षीय मुलीवर अत्याचार; आधी दोन्ही हात बांधले, मग...

सेनगाव - सेनगाव येथे एका १५ वर्षीय मुलीचे दोन्ही हात बांधून तिच्यावर जन्मदात्यानेच अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी २९ एप्रिल रोजी रात्री उशिरा सेनगाव पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या तक्रारीवरून पित्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. फरार झालेल्या आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

सेनगाव येथील ५५ वर्षीय व्यक्तीच्या पत्नीने आत्महत्या केल्याने मुलगी मामाकडे राहण्यास गेली होती. इकडे त्या व्यक्तीने दुसरे लग्न केले. मात्र, दुसऱ्या पत्नीसोबत पटले नसल्याने ती सोडून गेली. मामाकडे राहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलीस त्याने काही दिवसांपूर्वी सेनगाव येथे आणले. मुलीसाठी पित्याने गुलाब जामून, भेळ, कलाकंद खाण्यासाठी आणले. हे पदार्थ खाल्ल्याने मुलीस गुंगी आली. याचा फायदा घेत नराधम पित्याने मुलीवर १८, २० व २२ एप्रिल रोजी अत्याचार केला. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकीही दिली. ही घटना पीडित मुलीने मामाला सांगितली. मामा आल्यानंतर थेट पोलिस ठाणे गाठून नराधम पित्याविरुद्ध तक्रार दिली. तक्रार देताच पिता फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी नराधम पित्याचा शोध घेऊन पकडले.

Web Title: 15-year-old girl molested by father at Hingoli