दोन गटांत हाणामारी, दगडफेकीत पाच जखमी, १५ जण पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 02:42 IST2018-11-08T02:41:50+5:302018-11-08T02:42:15+5:30
पहूर पेठ ता. जामनेर येथे दोन गटात झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.

दोन गटांत हाणामारी, दगडफेकीत पाच जखमी, १५ जण पोलिसांच्या ताब्यात
जळगाव - पहूर पेठ ता. जामनेर येथे दोन गटात झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात दगडफेक झाल्याची घटना बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. यात पाच जण जखमी झाले आहेत. १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे दिवाळी उत्सवाला गालबोट लागले आहे.
खाटीक गल्लीत दोन गटात वाद झाला. नंतर हाणामारी सुरु झाली आणि दगडफेकही करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जामनेर येथून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. पोलिसांनी लागलीच धरपकड सुरु केली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. फटाके फोडण्याच्या शुल्लक कारणावरून घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.