शहरं
Join us  
Trending Stories
1
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
2
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
3
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
4
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
6
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
7
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
8
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
9
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
10
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
11
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
12
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
13
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
14
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
15
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
16
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
17
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
18
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
19
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
20
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल

नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलीवर गँगरेप; पीडितेने बाळाला जन्म देताच जिवंतच विहिरीत फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 10:21 AM

२० सप्टेंबरच्या दिवशी कदवाया गावात हनुमान मंदिराजवळील एका विहिरीत नवजात बालकाचा मृतदेह सापडला होता.

ठळक मुद्देजर ही गोष्ट बाहेर कुणाला कळाली तर तुला ठार करेन असं छोटूनं सांगितलंमागील ११ महिन्यापासून आरोपींनी या पीडितेवर अतिप्रसंग केला. त्यावेळी ही पीडित मुलगी गर्भवती झाली.या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी २५ सप्टेंबरला छोटू, राहुल, सचिनसह अन्य दोन अल्पवयीन मुलांना अटक केली.

मध्य प्रदेशच्या अशोकनगर भागात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत मागील काही महिन्यांपासून गँगरेप होत असल्याचं उघड झालं आहे. मुलीवर तिचा मावस भाऊ आणि त्याचे ४ मित्र गँगरेप करत होते. जेव्हा या पीडित मुलीनं एका चिमुकलीला जन्म दिला आणि नवजात मुलीला विहिरीत फेकलं तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणातील ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील २ आरोपी अल्पवयीन आहेत.

२० सप्टेंबरच्या दिवशी कदवाया गावात हनुमान मंदिराजवळील एका विहिरीत नवजात बालकाचा मृतदेह सापडला होता. लोकांनी हा मृतदेह पाहताच तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बालकाचा मृतदेह बाहेर काढला आणि या घटनेचा गुन्हा नोंद करून घेतला. नवजात मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करण्यात आलं. तेव्हा या मुलीला जिवंतच विहिरीत फेकून दिलं त्यानंतर पाण्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास करताना पोलिसांना अलीकडेच गावात १४ वर्षीय मुलीनं एका चिमुकलीला जन्म दिल्याचं कळालं. त्यानंतर पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा मुलीनं पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी या मुलीला बालसुधारगृहात पाठवलं आहे.

मुलीनं दिला पोलिसांना जबाब

पीडित मुलीनं पोलिसांना सांगितले की, ती वडिलांसोबत गावात राहते. जेव्हा ती लहान होती तेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये एकेदिवशी घरात एकटी होती. वडील शेतात काम करण्यासाठी गेले होते. तेव्हा गावातच राहणारा मावस भाऊ छोटू विश्वकर्मा घरी आला. छोटूनं पाहिलं असता घरात कुणीच नव्हतं. त्यानंतर छोटूनं तिच्यासोबत अतिप्रसंग केला. त्यानंतर मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. जर ही गोष्ट बाहेर कुणाला कळाली तर तुला ठार करेन असं छोटूनं सांगितलं. त्यानंतर पुन्हा छोटूनं पीडितेला बाहेर घेऊन गेला. तिथं त्याचा मित्र राहुलदेखील होता. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अन्य ३ जणांसोबत पीडितेला संबंध ठेवण्यास भाग पाडलं. मागील ११ महिन्यापासून आरोपींनी या पीडितेवर अतिप्रसंग केला. त्यावेळी ही पीडित मुलगी गर्भवती झाली. वडिलांचं या गोष्टीकडे लक्ष नव्हतं.

भीतीमुळं नवजात मुलीला विहिरीत फेकलं

पीडितेने पोलिसांना सांगितलं की, २० सप्टेंबरला ती शौचालयाला गेली होती तेव्हा तिची डिलिव्हरी झाली. भीतीपोटी मी नवजात मुलीला विहिरीत फेकलं. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी २५ सप्टेंबरला छोटू, राहुल, सचिनसह अन्य दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. पोलिसांनी आरोपींविरोधात ३७६ आणि पॉस्को अंतर्गत कारवाई केली आहे.

टॅग्स :Policeपोलिस