शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वडिलांच्या मित्राकडून 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 4:40 PM

वडिलांच्याच मित्राकडून सासष्टीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार होण्याची घटना घडली असून या प्रकरणातील संशयित सध्या नोकरीनिमित्त विदेशात गेल्याने गोवा पोलीस त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्याच्या तयारीत आहेत.

मडगाव: वडिलांच्याच मित्राकडून सासष्टीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार होण्याची घटना घडली असून या प्रकरणातील संशयित सध्या नोकरीनिमित्त विदेशात गेल्याने गोवा पोलीस त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्याच्या तयारीत आहेत.सदर घटना धर्मापूर-शिर्ली या गावात घडली असून मडगाव पोलिसांनी आरोपी इग्नेशियस कुतिन्हो (वय 50) याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान सदर संशयिताने त्या मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, संशयित कुतिन्हो हा पिडीत मुलीच्या घराशेजारीच राहत होता आणि त्या मुलीच्या वडिलांसोबत त्याची मैत्री होती. याच मैत्रीमुळे तो कित्येकदा त्या मुलीच्या घरी येत होता. मुलीचे वडील घरी नसल्याचा फायदा उठवित त्याने हे कृत्य केले. दरम्यान, या प्रकरणाची माहिती तिच्या वडिलांना मिळूनही आपल्या मुलीचे नाव खराब होईल या भीतीने या प्रकरणाचा त्यांनी गवगवा केला नाही.

मात्र, सदर मुलगी शाळेत गेली असता तिला त्रास व्हायला सुरु झाल्यानंतर शिक्षिकेने तिला खोदून विचारले असता, आपल्यावर आलेल्या अतिप्रसंगाची माहिती तिने त्या शिक्षिकेला दिली. त्या शिक्षिकेने चाईल्ड लाईन या मुलासंदर्भात काम करणा-या एनजीओला या घटनेची माहिती दिल्यानंतर या एनजीओने मंगळवारी मडगाव पोलिसात तक्रार दिली. सदर प्रकार या मुलीच्या मोठय़ा बहिणीलाही माहित होता. मात्र या घटनेची वाच्यता केल्यास संशयिताने त्या दोघींना जीवंत मारण्याची धमकी दिल्याने सुरुवातीला तिच्या बहिणीनेही कुणाला या संबंधात माहिती दिली नाही.

यासंदर्भात दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांना विचारले असता, 15 दिवसांपूर्वीच संशयित नोकरीनिमित्त विदेशात गेलेला असून या प्रकरणात त्याला अटक करण्यासाठी मडगाव पोलीस लवकरच लुक आऊट नोटीस जारी करतील असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी